Advertisement

मिठाईवर उत्पादन तारखेसह मुदत संपण्याचा कालावधी बंधनकारक

आता सर्व प्रकारच्या गोड पदार्थाच्या उत्पादनाची तारीख (Date of production) आणि मुदत संपण्याचा कालावधी (Expiration Period) जाहीर करणे दुकानांना बंधनकारक करण्यात आलं आहे.

मिठाईवर उत्पादन तारखेसह मुदत संपण्याचा कालावधी बंधनकारक
SHARES

 मुदत संपलेले गोड पदार्थ (Sweet foods) खाल्ल्याने प्रकृतीवर गंभीर परिणाम झाल्याच्या घटना अनेक ठिकाणी घडल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता सर्व प्रकारच्या गोड पदार्थाच्या उत्पादनाची तारीख (Date of production) आणि मुदत संपण्याचा कालावधी (Expiration Period) जाहीर करणे दुकानांना बंधनकारक करण्यात आलं आहे. अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण विभागाने (Department of Food Security and Standards Authority - एफएसएसआय) तसा आदेशच काढला आहे. . १ जून २०२० पासून हा निर्णय लागू होणार आहे. 

  मिठाईच्या दुकानांमध्ये खुल्या स्वरूपात विक्री केल्या जाणाऱ्या गोड पदार्थाबाबत (Sweet foods) उत्पादनाच्या तारखेसह (Date of production) मुदत संपण्याचा कालावधी नमूद नसतो. पाकीटबंद गोड पदार्थावर उत्पादनाची तारीख आणि मुदत संपण्याचा कालावधी (Expiration Period) असतो. मात्र, आता  दुकानांमधील पेढे, बर्फी, मावा, कुंदा अशा खुल्या स्वरूपातील किंवा पाकीटबंद नसलेल्या गोड पदार्थावरही उत्पादनाच्या तारखेसह हे पदार्थ वापरण्याची मुदत नमूद करणे बंधनकारक  एफएसएसआयने जाहीर केले आहे. खुल्या स्वरूपात विक्रीस ठेवलेले पेढे, बर्फी इत्यादी पदार्थाच्या खणांवर त्यांची निर्मिती आणि वापराची मुदत या दोन्ही बाबी ग्राहकांना स्पष्टपणे दिसेल अशा प्रकारे प्रदर्शित कराव्यात, असे या आदेशात नमूद केले आहे.

हा आदेश १ जूनपासून राज्यात लागू केला जाणार आहे.  खाद्यपदार्थ उत्पादकांची लवकरच बैठक बोलाविण्यात येणार असून यासंबंधीच्या सूचना दिल्या जाणार आहेत.  या आदेशांचे पालन न झाल्यास कारवाई करण्यात येणार आहे. 


हेही वाचा -

‘झोपु’तील नियमबाह्य घर विक्रीचे व्यवहार दंड आकारून नियमित

मालमत्ता कराची २६४४ कोटींची थकबाकी




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा