नीरव मोदीचा आलिशान बंगला डायनामाईटने उडवणार!

पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार कोटींचा गंडा घालून पळालेला हिरे व्यापारी नीरव मोदीचा अलीबागमधील अलिशान बंगला जमिनदोस्त करण्यात येणार आहे. कंट्रोल ब्लास्ट करून त्याचा अनधिकृत बंगला पाडण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे.

नीरव मोदीचा आलिशान बंगला डायनामाईटने उडवणार!
SHARES

पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार कोटींचा गंडा घालून पळालेला हिरे व्यापारी नीरव मोदीचा अलीबागमधील अलिशान बंगला जमिनदोस्त करण्यात येणार आहे. डायनामाईटचा कंट्रोल ब्लास्ट करून हा अनधिकृत बंगला पाडण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे.


ब्लास्टने बंगला पाडणार

नीरव मोदीचा हा बंगला अलिबागमधील किहिम बीचवर आहे. या बंगल्यावर सक्तवसूली संचलानालयाने (ईडी) जप्ती आणली होती. तसंच विद्यामान जिल्हाधिकाऱ्यांनी हा बंगला अनधिकृत असल्याचं सांगत तो पाडण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर जेसीबी आणि पोकलेन मशीनच्या साहाय्यानं बंगला पाडण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. परंतु काही अडचणींमुळं जानेवारी महिन्याच्या अखेरिस हे काम थांबवण्यात आलं. आता पुन्हा हा बंगला पाडण्याचं काम हाती घेण्यात आलं असून ८ मार्चला कंट्रोल ब्लास्ट करून बंगला पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी एका टेक्निकल टिमलाही बोलवण्यात आलं आहे.


वस्तूंचा लिलाव

नीरव मोदीचा हा अलिशान बंगला २० हजार चौरस मीटरच्या क्षेत्रात उभारलेला आहे. तसंच अनेक महागड्या वस्तूंनीही हा बंगला सजवण्यात आला आहे. या बंगल्यामध्ये सापडलेल्या अनेक महागड्या वस्तूंचा लिलाव करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे.
हेही वाचा -  

मनसेला कल्याणची जागा?, महाआघाडीत समावेशाची शक्यता

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू
संबंधित विषय