'त्या घोटाळेबाजाची संपत्ती पहिल्यांदा ताब्यात घ्या...' न्यायालयाचे आदेश

मनी लाँड्रिंग प्रकरणी नीरव मोदीची सर्व संपत्ती जप्त करण्याचे आदेश सोमवारी दिले आहेत. आर्थिक गुन्हेगार फरार कायद्यांतर्गत हा आदेश पहिल्यांदाच देण्यात आल्याचेे कळते.

'त्या घोटाळेबाजाची संपत्ती पहिल्यांदा ताब्यात घ्या...' न्यायालयाचे आदेश
SHARES
पंजाब नँशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीवर मोदीच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. ईडीने आधीत त्याच्या महागड्या वस्तू ताब्यात घेतल्यानंतर सोमवारी नीरवचे आलिशान घर ही ताब्यात घेण्याचे आदेश न्यायालयाने ईडीला दिलेेेेले आहे. आर्थिक फसवणूक कायद्यांतर्गत फरार असलेल्या आरोपीच्या मालकीची मालमत्ता जप्त करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जाते.

पंजाब नॅशनल बँकेत 13 हजार कोटी रुपयांचा घोटाळा करून लंडन येथे फरार झालेल्या नीरव मोदीच्या अडचणीत वाढ झाली आहे. हिरेे व्यापारी नीरव मोदीला पीएमएलए विशेष न्यायलयाने दणका देेत, न्यायालयाने मनी लाँड्रिंग प्रकरणी नीरव मोदीची सर्व संपत्ती जप्त करण्याचे आदेश सोमवारी दिले आहेत. आर्थिक गुन्हेगार फरार कायद्यांतर्गत हा आदेश पहिल्यांदाच देण्यात आल्याचेे कळते. यानुसार जप्त केलेल्या नीरव मोदींच्या सर्व मालमत्तांवर आता भारत सरकारचा ताबा असणार आहे. या मालमत्तेत प्रामुख्याने नीरवच्या वरळी येथील महल इमारतीत असलेल्या सहा अपार्टमेंटचा ही समावेश आहे. त्यातील प्रत्येक अपार्टमेंटची किंमत ही जवळपास 100 कोटी इतकी असेल. त्याच बरोबर त्याच्या नावावर असलेले कोट्यावधी रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम ही ताब्यात घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच त्याचे कालाघोडा येथे असलेले बहुतर्चित रिदम नावाचे 3400 चौ.फूट म्युझिक हाऊस ही जप्त केले जाणार आहे. तर ब्रीच कँन्डी येथील 1 आणि ओपेरा हाऊस येथील 3 घरांचा या जप्तीत समावेश आहे. त्याच बरोबर नीरवची मुंबई, सूरज आणि जयपूर येथील फोरस्टार डायमंड कंपनीच्या नावावर असलेली सर्व कार्यालय ही जप्त केली जाणार आहेत.


या पूर्वी नीरवच्या महागड्या वस्तूचा न्यायालयाच्या आदेशानुसारच लिलाव केला गेला होता. त्यावेळी 51 कोटी रुपये जमा झालेले होतेे. त्या लिलावात नीरवच्या महागड्या कार, पेंटीग्ज, घड्याळ, पर्स आणि इतर गोष्टींचा समावेश होता. तर त्याचे अलिबाग समुद्र किनारी बांधलेला आलिशान बंंगला ही नियमांचे उल्लंघन करून बांधला असल्याचे कारण देत, काही दिवसांपूर्वी तो जमिनदोस्त करण्यात आला होता. ज्या पद्धतीने विजय मल्या भोवती फास आवळला जात असून लवकरच त्याच् प्रत्यार्पण केले जाणार आहे. त्याच पद्धतीने नीरवला पून्हा भारतात आणण्यासाठी ईडीकडून सुरु असलेल्या हालचालींना आता वेग आला आहे.





संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा