TRP scam: टीआरपी घोटाळ्यातील फरार आरोपीस पोलिसांनी केली अटक

पोलिसांनी दिनेश विश्वकर्मा आणि राँकीला पहिल्या दिवसापासून फरार घोषीत केले होते.

TRP scam: टीआरपी घोटाळ्यातील फरार आरोपीस पोलिसांनी केली अटक
SHARES

टीआरपी घोटाळा प्रकरणांतील मुख्य आरोपी दिनेश विश्वकर्मा (३७) याला पकडण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. मागील अनेक दिवसांपासून पोलिस दिनेशच्या शोधात होते. दिनेश हा वाणारसीहून मुंबईला आला असताना. त्याला पोलिसांनी विमानतळावरुन अटक केली आहे. दिनेश हा हंसाचा कर्मचारी होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांचे सीआययूचे पथक अधिक तपास करत आहेत.

हेही वाचाः- दादरमधील अगरबाजार परिसरात मोठी आग

मुंबईतल्या चांदिवली संघर्ष नगर परिसरात दिनेश विश्वकर्मा हा राहतो. दिनेश हा उमेशला पैसे देत असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्यामुळे पहिल्या दिवसापासून पोलिस दिनेशच्या शोधात होते. पोलिसांनी दिनेश विश्वकर्मा आणि राँकीला पहिल्या दिवसापासून फरार घोषीत केले होते. तर दुसरीकडे रामजी वर्मा याला ही मुंबईतून अटक करण्यात आली आहे. रामजी हा हंसाचा माजी कर्मचारी असून तो कंपनीत २०१३ ते २०१४ दरम्यान कार्यरत होता. उमेश मिश्राला त्या वृत्तवाहिसंदर्भातील काॅन्टॅक्ट रामजीने दिले होते. आतापर्यंत या प्रकरणात सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच  एका वृत्तवाहिनीची भागीदार कंपनी इबीक्स कॅश टेक्नोलाॅजीचे एमडी मिलन गणात्रा यांचा जबाब नोंदवण्यात आला. या वृत्त वाहिनीला स्पाॅन्सर केल्याबद्दल त्यांचा जबाब नोंदवण्यात आला. तसेच CIUने आणखी कागदपत्रे मागितली आहेत. प्रविण निजारा हंसाचे सीईओ तसेच हंसाच्या आजी-माजी कर्मचाऱ्यांचा तपशील मागवण्यात आला आहे. उमेश मिश्राला त्या वृत्तवाहिसंदर्भातील काॅन्टॅक्ट रामजीने दिले होते.

हेही वाचाः- ठरलं एकदाचं! खडसेंचा राष्ट्रवादीत ‘या’ दिवशी प्रवेश

दरम्यान, पोलिसांनी शुक्रवारी विमा, वित्तीय, आरोग्यसेवा आणि ई-लर्निंग उद्योगांना ऑन-डिमांड सॉफ्टवेयर आणि ई-कॉमर्स सेवा देणारे आंतरराष्ट्रीय कंपनी एबिक्स इंकच्या अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवले. एका वृत्तवाहिनीने गेल्या वर्षी एबिक्स कॅश स्टुडिओच्या स्थापनेसह ब्रँड आणि बातम्यांचे संचलन करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार, एबिक्स कॅश स्टुडिओमधून बातम्या आणि संबंधित कार्यक्रम संचालित केले जातात.

Read this story in हिंदी
संबंधित विषय