Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
58,76,087
Recovered:
56,08,753
Deaths:
1,03,748
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,122
660
Maharashtra
1,60,693
12,207

ठरलं एकदाचं! खडसेंचा राष्ट्रवादीत ‘या’ दिवशी प्रवेश

भारतीय जनता पक्षाकडून सातत्याने दुय्यम वागणूक मिळत असल्याने नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे अखेर पक्षाला सोडचिठ्ठी देणार आहेत.

ठरलं एकदाचं! खडसेंचा राष्ट्रवादीत ‘या’ दिवशी प्रवेश
SHARES

भारतीय जनता पक्षाकडून सातत्याने दुय्यम वागणूक मिळत असल्याने नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे अखेर पक्षाला सोडचिठ्ठी देणार आहेत. येत्या शुक्रवारी म्हणजेच २३ आॅक्टोबर रोजी खडसे अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेणार आहेत. खुद्द राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीच ही घोषणा केली आहे. या प्रवेशामुळे भाजपला उत्तर महाराष्ट्रात मोठा झटका बसणार आहे.

मागील काही दिवसांपासून एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यांनी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्याशी गुफ्तगू केल्यानंतर या चर्चांना उत आला होता. त्यानंतर जयंत पाटील यांनीच पत्रकार परिषद घेऊन एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाबद्दलची माहिती सर्वांना दिली. (political leader eknath khadse to join ncp after quit bjp maharashtra)

हेही वाचा - मी घरची धुणी रस्त्यावर धूत नाही, फडणवीसांचा खडसेंवर पलटवार

यावेळी जयंत पाटील यांनी सांगितलं की, भाजपचा महाराष्ट्रात विस्तार करण्यात एकनाथ खडसे यांचा मोलाचा वाटा होता. परंतु पक्षाकडून त्यांच्यावर सातत्याने अन्याय होत असल्याने त्यांनी पक्ष सोडल्याचं आम्हाला सांगितलं. त्यानंतरच खडसेंसारख्या अनुभवी नेत्याला राष्ट्रवादीत प्रवेश देण्याचं ठरवण्यात आलं आहे. शुक्रवारी दुपारी २ वाजता एकनाथ खडसे राष्ट्रवादीत अधिकृतरित्या प्रवेश करतील. त्यांना कुठलं पद देण्यात येईल यावर सध्यातरी काहीच सांगता येणार नाही.

एकनाथ खडसे यांच्यासोबतच भाजपचे १० ते १२ आमदार देखील राष्ट्रवादीत येण्यास अनेकजण इच्छुक आहेत. परंतु कोरोनाच्या संकटात विधानसभेच्या निवडणुका घेणं परवडणार नाही. पुढील काही दिवसांमध्ये या नेत्यांना हळुहळू प्रवेश देण्यात येईल. जे कुठले आमदार किंवा नेते राष्ट्रवादीत प्रवेश करतील ते सर्वांसमक्ष प्रवेश करतील. कुणालाही अंधारात प्रवेश दिला जाणार नाही, असं म्हणत जयंत पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केला.

महाविकास आघाडीचं सरकार पुढील ५ वर्षे चालेल यात शंका नसून पुढच्या निवडणुकीतही राष्ट्रवादीचं वर्चस्व असेल, असंही जयंत पाटील म्हणाले. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा