Advertisement

मी घरची धुणी रस्त्यावर धूत नाही, फडणवीसांचा खडसेंवर पलटवार

माझ्यामध्ये अजूनही संयम आहे, समस्या चर्चा करुन सोडवता येतात. कारण मी घरची धुणी रस्त्यावर धूत नाही, असं म्हणत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याच पक्षातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर पलटवार केला आहे.

मी घरची धुणी रस्त्यावर धूत नाही, फडणवीसांचा खडसेंवर पलटवार
SHARES

माझ्यामध्ये अजूनही संयम आहे, समस्या चर्चा करुन सोडवता येतात. कारण मी घरची धुणी रस्त्यावर धूत नाही, असं म्हणत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याच पक्षातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर पलटवार केला आहे. (opposition leader devendra fadnavis denies allegations from eknath khadse)

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे सातत्याने आरोप करत असल्याबद्दल प्रसारमाध्यमांनी दिल्लीत गेलेल्या देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, एकनाथ खडसे हे पक्षातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे मी त्यांच्यावर टीका वा टिप्पणी करणार नाही. परंतु ते ज्या मनिष भंगाळे बाबत सातत्याने सांगत आहेत, त्यात काहीच तथ्य नाही. कारण या प्रकरणात त्यांना राजीनामा द्यावा लागलेला नाही. मनिष भंगाळेच्या आरोपानंतर मी एडीजी एटीएसची कमिटी बनवून १२ तासांत रिपोर्ट द्यायला लावला. या रिपाेर्टमध्येच अवघ्या १२ तासांतच खडसेंना क्लीन चिट मिळाली आणि भंगाळेला तुरूंगात टाकण्यात आलं होतं, असा खुलासा फडणवीसांनी केला.

हेही वाचा - यशस्वी होण्यासाठी उद्धव ठाकरेंनी फडणवीसांकडून ट्रेनिंग घ्यावं, भाजपचा सल्ला

खडसेंना एमआयडीसी प्रकरणात राजीनामा द्यावा लागल्याचंही फडणवीसांनी नमूद केलं. खडसेंच्या कुटुंबाने एमआयडीसीची जमीन घेतली होती. त्यावर त्यांनी स्वत: एक बैठक घेतली होती. त्यांच्यावरील आरोपानंतर मुख्यमंत्री म्हणून मी या प्रकरणात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची समिती तयार केली. या समितीचा अहवाल येण्याआधी काही जण उच्च न्यायालयात गेले होते. उच्च न्यायालयाने खडसेंवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल कण्याचा निर्णय दिला. त्यामुळे तो गुन्हा मी दाखल केलेला नाही. न्यायालयाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिल्यानंतरही संबंधित प्रकरणात दोनच महिन्यात आम्ही उच्च न्यायालयात अहवाल दाखल केला पण तो कोर्टाने स्वीकारला नाही. त्यामुळे माझ्याबद्दल विनाकारण लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचे कारण नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी आपली बाजू मांडली.

खडसेंच्या तक्रारींवर आम्ही घरातल्या घरात बसून, चर्चा करू आणि त्या सोडवू. खडसेंबाबतची सगळी वस्तुस्थिती पक्षश्रेष्ठींना माहीत असल्याचंही फडणवीसांनी नमूद केलं.

मुख्यमंत्रिपदाचा दावेदार असल्याने फडणवीस यांनी माझ्याविरुद्ध अनेक षडयंत्रे रचली. हॅकर मनीष भंगाळेला फडणवीस यांनी रात्री दीड वाजता भेट दिली. अंजली दमानिया यांना वेळ दिली. पण मुख्यमंत्री खडसेंना भेटत नव्हते. आमचे मुख्यमंत्री  ड्राय क्लिनर होते. कोणावरही आरोप झाले की लगेच क्लिनचिट मिळायची. मात्र खडसे यांना निर्दोष असताना क्लिनचिट मिळाली नाही. माझ्यावर अन्याय झाला आहे. हा नाथाभाऊ अन्याय सहन करणारा नाही, स्वस्थ बसणारा नाही. पक्षच्या नेत्यांकडून न्याय मिळत नाही तोपर्यंत भांडणार, असे आरोप एकनाथ खडसे यांनी केले होते.

हेही वाचा - कमी कोरोना चाचण्यांमुळे महाराष्ट्रातील परिस्थिती गंभीर- देवेंद्र फडणवीस

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा