विरारच्या नगरसेवकाची बाईक चोरणारे 'ते' चोरटे गजाआड

 Mumbai
विरारच्या नगरसेवकाची बाईक चोरणारे 'ते' चोरटे गजाआड
Mumbai  -  

विरार महानगरपालिकेच्या नगरसेवकांची दुचाकी चोरी करणाऱ्या दोघा अल्पवयीन चोरांना तुळींज पोलिसांनी दुचाकीसह अटक केली आहे. नगरसेवक किशोर पाटील हे स्थानिक बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक आहेत.

गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजेच 29 मार्चला या आरोपींनी मनपा नगरसेवक किशोर पाटील यांची दुचाकी चोरी केली होती.

त्यानंतर पाटील यांनी तुळींज पोलीस ठाण्यात याप्रकरणाची तक्रार दाखल केली होती. तुळींज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश साखरकर यांनी सांगितलं की, शोध पथक नालासोपारा (पू.) इथल्या अंबावाडी परिसरात पेट्रोलिंग करत होते. पेट्रोलिंग करत असताना नगरेसवकांची दुचाकी तिथे असल्याचा संशय आल्यानंतर शोध पथकाने तपास केला. त्यानंतर ती दुचाकी नगरसेवक किशोर पाटील यांची असल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर या दोन्ही आरोपींना अटक केली. या दोन्ही आरोपींनी मजा मस्तीसाठी दुचाकीची चोरी करत असल्याचं कबूल केल्याचंही पोलिसांनी सांगितलं.

हे बाईक चोर सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते. काय होतं या सीसीटीव्ही फुटेजमध्ये, पहाण्यासाठी लिंकवर क्लिक करा

https://www.mumbailive.com/hi/city/police-delays-in-registering-complaint-of-bike-theft-9826

Loading Comments