वडाळ्यात ज्वेलर्सवर दरोडा टाकणाऱ्या दोघांना अटक


वडाळ्यात ज्वेलर्सवर दरोडा टाकणाऱ्या दोघांना अटक
SHARES

वडाळाच्या सायन म्हाडा कॉलनी परिसरातील काजल ज्वेलर्सवर दरोडा टाकणाऱ्या दोघांना अटक करण्यात वडाळा टीटी पोलिसांना यश आलं आहे. नारायण गुरुजर (23),सुरेश लोहार (22) अशी या दोघांची नावं आहेत. यातील मुख्य आरोपी नारायण चंपालाल गुरूजर (22) अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे.


दोन कोटींचा ऐवज लंपास

मूळचे गुजरातचे असलेले काजल ज्वेलर्सचे मालक महेंद्र मंदावर यांचं वडाळा येथील म्हाडा कॉलनी परिसरात सोने-चांदीचे दुकान आहे. गुरुवारी दुपारी २.३० वा. नेहमीप्रमाणे महेंद्र हे जेवण्यासाठी दुकान बंद करून जेवायला गेले. याच संधीचा फायदा घेत आरोपी नारायण गुरूजरने बनावट चावीच्या मदतीने ज्वेलर्स उघडून तब्बल दोन कोटींचा ऐवज चोरला होता. या प्रकरणात आरोपींची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी त्यांना राजस्थानच्या बागौर येथून अटक केली आहे.


दोघांना अटक

यातील आरोपी नारायण गुरूजर हा तीन वर्ष व्यापाऱ्याकडे कामाला होता. त्यामुळे दुकानात व्यापाऱ्याच्या प्रत्येक गोष्टीची त्याला माहिती होती. चोरी करण्याच्या उद्देशानेच मालकाच्या नकळत त्याने दुकानाच्या बनावट चाव्या बनवल्या होत्या. कालांतराने नोकरी सोडल्यानंतर चोरी केल्यास आपल्यावर कुणी संशय घेणार नाही. त्यामुळेच त्याने नोकरी सोडून दिल्यानंतर मित्र सुरेश लोहार आणि नारायण चंपालाल गुरूजर याच्या मदतीने गुरुवारी दुपारी चोरी केली. तेथून तिघंही राजस्थानला पळून गेले.


तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू

आरोपींची माहिती मिळाल्यानंतर वडाळा टीटी पोलिसांनी राजस्थानच्या स्थानिक पोलिसांची मदत घेऊन यातील दोघांना अटक केली. या प्रकरणातील तिसरा आरोपी नारायण चंपालाल गुरूजर हा अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोघ घेत आहेत. चोरट्यांनी लुटलेल्या 2 कोटी मौल्यवान दागिन्यांपैकी पोलिसांनी 1 किलो 400 ग्रॅम मौल्यवान दागिने हस्तगत केले आहे. या प्रकरणातील तिसरा आरोपी नारायण चंपालाल गुरुजरचा पोलिस आता शोध घेत आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा