दुधात भेसळ करणारी टोळी जेरबंद; ४२९ पिशव्या जप्त

मालाडच्या क्वारी रोड परिसरात पहाटे काही जण दुधाची भेसळ करत असल्याची माहिती गुन्हे शाखा ११ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चिमाजी आव्हाड यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी सापळा रचून या सहा जणांना दुधात भेसळ करताना रंगेहाथ अटक केली.

दुधात भेसळ करणारी टोळी जेरबंद; ४२९ पिशव्या जप्त
SHARES

दुधाच्या पिशवीत नळावरील पाण्याची भेसळ करणाऱ्या सहा जणांना गुन्हे शाखा ११ च्या पोलिसांनी मालाडमधील क्वारी रोड येथून पहाटे अटक केली आहे. कृष्णा मल्लय्य अंबती (४९), अंजना नरसिम्मा मुतियाला (३२), शंकर रच्चामल्ला (१९), सईदुल्ला अलिती (३५), सुजत मुतियला (२५), रामुल्लमा राचमल्ला (४०) अशी आरोपींची नावे आहेत. या आरोपींजवळून पोलिसांनी ४२९ दुधाच्या पिशव्या जप्त केल्या अाहेत.


अमूलमध्ये भेसळ

मालाडच्या क्वारी रोड परिसरात पहाटे काही जण दुधाची भेसळ करत असल्याची माहिती गुन्हे शाखा ११ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चिमाजी आव्हाड यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी सापळा रचून या सहा जणांना दुधात भेसळ करताना रंगेहाथ अटक केली. हे सर्व जण अमूल दुधाच्या पिशवी फोडून त्यात पाण्याची भेसळ करत होते. पोलिसांनी यावेळी ५०० मिलीच्या ४२९ भेसळयुक्त पिशव्या हस्तगत केल्या.


गोरेगावच्या व्यक्तीचा हात

या प्रकरणी पोलिसांनी दिंडोशी पोलिस ठाण्यात ४७४/१८ नुसार भा.द.वि. कलम २७२, ४८२,४८३, ४२०, ४६८,३४ सह ७,१६ या अन्न भेसळ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहेत. या टोळीमागे गोरेगावच्या एका व्यक्तीचा हात असल्याची माहिती चौकशीतून पुढे आली असून पोलिस त्याचा शोध घेत आहे.



हेही वाचा-

मुंबई-गोवा मार्गावरील भीषण अपघातात सहा मुंबईकर ठार

गुंगीचं औषध देऊन एक्स्प्रेसमध्ये लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश



 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा