धारावीतील बोगस लसीकरण सर्टिफिकेट बनवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

धारावीतील बोगस लसीकरण प्रमाणपत्र बनवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे.

धारावीतील बोगस लसीकरण सर्टिफिकेट बनवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश
SHARES

धारावीतील बोगस लसीकरण प्रमाणपत्र बनवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. १००० रुपयांमध्ये लोकांना दोन्ही लसीकरण झाल्याचं प्रमाणपत्र या टोळीकडून दिलं जात होतं. इतकंच नव्हे तर या बनावट प्रमाणपत्राची नोंदणी कोविन अॅप वरसुद्धा दिसत होती. या प्रकारामुळे पोलिसांच्या भुवया उंचावल्या आहेत.

कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी यंत्रणा लसीकरण वाढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर, धारावीमध्ये लसीकरणाच्या बनावट प्रमाणपत्राची एक हजार रुपयांत सर्रास विक्री करण्यात येत होती.

लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतरही धारावीतील लसीकरणावर प्रशासन विशेष लक्ष देत आहे. एकही दिवस मुंबई बाहेर न जाता बिहारमध्ये लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र देणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी अटक केली आहे.

धारावीतील एका सायबर कॅफे मालकाकडून हे प्रमाणपत्र मिळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सेकारन फ्रान्सिस नाडर (वय ३६) हा सायबर कॅफे मालक अवघ्या एक हजार रुपयांमध्ये कोरोना लशीच्या मात्रा घेतल्याचे प्रमाणपत्र पुरवत होता.

पोलिसांनी एका ग्राहकाला त्याच्याकडे पाठवले. नाडरनं त्याला लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतर त्याला धारावी पोलिसांनी बुधवारी अटक केली. पोलिसांनी पाठवलेला ग्राहक मुंबईत असतानाही बिहारमध्ये लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. आरोपीनं यापूर्वी किमान चार जणांचं लसीकरण झाल्याचं प्रमाणपत्र दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.



हेही वाचा

धारावीत तब्बल १०७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

मुंबईत रेल्वे स्टेशनवर एक्स बॉयफ्रेंडने रेझरने चिरला महिलेचा गळा

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा