आमदार निवासस्थानी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शिक्षकाला अखेर अटक

तब्बल एका तासाच्या अथक प्रयत्नानंतर पोलिसांनी आणि मंत्र्यांनी आत्महत्या करण्याऱ्या शिक्षकाला वेतन देण्याचे आश्वासन दिल्यानंतरच तो खाली उतरला.

आमदार निवासस्थानी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शिक्षकाला अखेर अटक
SHARES

महाराष्ट्रातील युवा पिढीला शिक्षणाच्या प्रवाहात आणणाऱ्या शिक्षकांच्या विविध प्रश्नांकडे सरकारकडून कायम दुर्लक्ष केले जाते. अशातच कोरोनामुळे सरकारचे आर्थिक डोलारा कोलमडून पडल्याने शिक्षकांचे वेतन थांबवण्यात आले. हा अन्याय सहन न झालेल्या एका शिक्षकाने बुधवारी आकाशवाणी आमदार निवास येथे आत्महत्येचा प्रयत्न केला. तब्बल एका तासाच्या अथक प्रयत्नानंतर पोलिसांनी आणि मंत्र्यांनी आत्महत्या करण्याऱ्या शिक्षकाला वेतन देण्याचे आश्वासन दिल्यानंतरच तो खाली उतरला. मात्र या प्रकरणी आता मरीनड्राइव्ह पोलिसांनी त्या शिक्षकाला अटक करत, त्याची जामीनावर मुक्तता केली आहे.  

हेही वाचाः- Good News: राज्यात पोलिसांची मेगा भरती; १२,५२८ जागा भरणार

राज्यातील शिक्षकांचे प्रश्नांना न्याय मिळावा यासाठी गजानन खैरे हे मागील अनेक वर्षांपासून झटत आहेत. सध्या कोरोना विषाणूच्या काळात राज्य सरकारचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडून गेले आहे. आता वेतन मिळत नसल्याने आकाशवाणी आमदार निवासस्थानी गजानन खैरे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या गोष्टीची माहिती मिळतात परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस अधिकारी अग्निशमन दलाचे लोक घटना स्थळी दाखल झाले आहेत. मंत्रालयात सर्वपक्षीय बैठक सुरु असतानाच शिक्षकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने गोंधळ उडाला. ‘जोपर्यंत मला वेतन मिळत नाही व याचे याचे लेखी आश्वासन मिळत नाही, याबाबतचा अध्यादेश निघत नाही, तोपर्यंत मी मागे हटणार नाही’, असे खैरे सांगत होते.

हेही वाचाः-मराठा समाजाला नाराजी व्यक्त करू द्या, अन्यथा… संभाजीराजेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा

राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांना अनुदान द्या व सेवा संरक्षण देण्याच्या मागणीसाठी, शिक्षक नेते गजानन खैरे यांनी अन्नत्याग, पायी दिंडी आंदोलन केले होते. त्यावेळी विनानुदानित शिक्षकांना अनुदान देण्यासाठी शासन अनुकूल असून लवकरच निर्णय घेतला जाईल व यासाठी मी स्वत: पुढाकार घेतला असल्याचे आश्वासन शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले होते. याच गोष्टीचा पाठपुरावा करण्यासाठी ते काही दिवसांपासून आमदार निवास येथे राहत होते मात्र त्यांच्या मागण्या मान्य न झाल्याने आज त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या गोष्टीची माहिती मिळतात, उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंकडून त्या शिक्षकाची समजूत काढल्यानंतर खैरे खाली उतरल्याचे सांगितले जाते. या घटनेनंतर मरीनड्राइव्ह पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात खैरेंवर भा.द.वि कलम ३०९ नुसार  गुन्हा नोंदवून त्यांना शुक्रवारी अटक केली. खैरे यांना न्यायालयात हजर केले असता. न्यायालयाने त्यांना ७ हजार ५०० रुपयांच्या जामीन्यावर सुटका केली आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा