Advertisement

Good News: राज्यात पोलिसांची मेगा भरती; १२,५२८ जागा भरणार

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पोलिसांच्या रिक्त जागा तातडीने भरण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे.

Good News: राज्यात पोलिसांची मेगा भरती; १२,५२८ जागा भरणार
SHARES

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पोलिसांच्या रिक्त जागा तातडीने भरण्याचा निर्णय बुधवार १६ सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे. या निर्णयानुसार १२,५२८ पोलिसांची भरती करण्यात करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. (maharashtra government will be recruited 12500 more police personnel says state home minister anil deshmukh)

यासंदर्भात अधिक माहिती देताना अनिल देशमुख यांनी सांगितलं की, राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत महाराष्ट्रात १२ हजार ५२८ पदांसाठी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच इतकी मोठी भरती होणार आहे. पोलीस भरतीची ही प्रक्रिया लवकरात लवकर सुरु करण्यात येईल. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामीण भागातील तरुण आणि तरुणींना पोलीस खात्यात भरती होण्याची संधी मिळणार आहे.

पोलीस शिपाई संवर्गातील १२ हजार ५२८ पदे १०० टक्के भरण्यात येत आहेत. यासंदर्भात वित्त विभागाच्या ४ मे २०२० च्या शासन निर्णयातून सूट देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मा. सर्वोच्च न्यायालयाने सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाच्या आरक्षणास दिलेल्या अंतरिम स्थगितीच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणी सामान्य प्रशासन विभाग व विधी व न्याय विभागाच्या सल्ल्यानुसार पुढील कार्यवाही करण्याचे मंत्रिमंडळाने गृह विभागाला निर्देशित केलं आहे.

हेही वाचा - मुंबई पोलिसांची नाहक बदनामी, गृहमंत्र्यांचा याचिकेला पाठिंबा

कोरोनाचं संकट आणि लाॅकडाऊनच्या काळामध्ये पोलीस विभागाने अत्यंत महत्त्वाचं कार्य केलेलं आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस शिपाई वर्गातील पदांची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे या संवर्गातील १००% टक्के रिक्त पदे भरणं आवश्यक आहे. पोलीस शिपाई गट क संवर्गातील २०१९ या भरती वर्षात रिक्त असलेली ५२९७ पदे व २०२० या भरती वर्षात सेवानिवृत्ती, पदोन्नती, राजीनामा यामुळे रिक्त होणारी पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई या संवर्गातील एकूण ६७२६ पदे त्याचप्रमाणे मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयासाठी निर्माण करण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील नवनिर्मित ९७५ पदांपैकी पोलीस शिपाई संवर्गातील ५०५ अशी एकूण १२,५२८ पदे भरण्यात येणार आहेत, अशी माहिती याआधी अनिल देशमुख यांनी दिली होती.

२०१९ मध्ये अर्ज केलेल्यांना दिलासा

२०१९ मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी ज्यांनी महाआय.टी. पोर्टल मार्फत अर्ज केलेले आहेत. त्या अर्जाबाबतही योग्य ती कार्यवाही केली जाईल. पोलीस शिपाई पदाची भरती प्रक्रिया लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, कागदपत्रांची पडताळणी, अशा विविध टप्प्यावर पार पडत असल्याने ही प्रक्रिया दीर्घकाळ सुरू राहते. त्यामुळे एकाच भरती प्रक्रियेत जास्तीत जास्त पदे भरण्याबाबत विभाग विचार करत आहे, असंही अनिल देशमुख यांनी २ महिन्यांआधी सांगितलं होतं.


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा