Advertisement

मराठा समाजाला नाराजी व्यक्त करू द्या, अन्यथा… संभाजीराजेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्यानंतर समाजातील संघटनांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे.

मराठा समाजाला नाराजी व्यक्त करू द्या, अन्यथा… संभाजीराजेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा
SHARES

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्यानंतर समाजातील संघटनांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. परंतु पोलीस प्रशासन आंदोलकांना नोटीस बजावून दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. मराठा समाजाला आपली नाराजी व्यक्त करण्याची मुभा देण्यात यावी, आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास ते चिघळण्याचीच शक्यता जास्त आहे, असा इशारा भाजप खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून दिला आहे. (bjp mp sambhaji raje wrote a letter to maharashtra cm uddhav thackeray on maratha community agitation for maratha reservation)

आपल्या पत्रात संभाजीराजे म्हणतात, मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यानंतर समाजामध्ये अस्वस्थतेचं वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे समाजातील संघटनांनी आंदाेलनाची भूमिका घेतली आहे. जिल्हा स्तरावर सकल मराठा समाजाच्या बैठका होत आहेत आणि आंदोलनाची दिशा ठरत आहे. 

परंतु पोलीस प्रशासनाने काही आंदोलकांना नोटीस बजावणं सुरू केलं आहे. नाशिक, पुणे आणि मराठवाड्यातील आंदोलकांना पोलीस वैयक्तिक फोन करून आणि नोटिशी बजावून आंदोलकांवर दबाव आणण्याचा प्रकार सुरू केला आहे. 

हेही वाचा - शरद पवार सगळ्या विषयांवर बाेलतात, पण मराठा आरक्षणावर गप्प का?

मराठा समाज हा आक्रमक म्हणून ओळखला जातो. जिथं अन्याय झाला, तिथं न्यायाची बाजू घेऊन लढणारा हा समाज आहे. मग तेव्हा त्याने कधीच जात, पात, धर्म, पाहिला नाही. सर्वांसाठी लढण्याची भूमिका घेतली. आज हा लढा स्वत:साठीच उभारण्याची वेळ आली आहे. देश संरक्षणार्थ नेहमीच सज्ज असणारा हा समाज कायद्याचं पालन करणारा आहे. मूक मोर्चावेळी सर्व जगाने ते पाहिलं आहे.

न्याय हक्कासाठी लोकशाही मार्गाने लढा उभारणं हा प्रत्येक व्यक्ती आणि समाजाचा अधिकार आहे. त्या अधिकाराची गळचेपी न करता मराठा समाजाला आपली नाराजी व्यक्त करण्याची मुभा देण्यात यावी. त्या उपरही प्रशासनाने सहकार्य न करता आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास ते चिघळण्याचीच शक्यता जास्त आहे. त्यामुळे मराठा आंदोलकांना पोलीस आणि प्रशासनाने सन्मानाची वागणूक द्यावी, अशी मागणी संभाजीराजे यांनी पत्रातून केली आहे. 

दरम्यान, मराठा आरक्षणा विषयी चर्चा करण्यासाठी मा.शरद पवार साहेबांनी मला निमंत्रित केले होते. त्याप्रमाणे दिल्ली येथील त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नी गट, तट, पक्ष न पाहता सर्वांनी एकत्र आल पाहिजे हिच भूमिका प्रभावीपणे मांडली, अशी माहती देखील संभाजी राजे यांनी दिली.

हेही वाचा -  Maratha Reservation : मराठा बांधवांनो, सरकार तुमच्यासोबत, आंदोलन करू नका - मुख्यमंत्री
Read this story in English
संबंधित विषय
Advertisement