Advertisement

Maratha Reservation : मराठा बांधवांनो, सरकार तुमच्यासोबत, आंदोलन करू नका - मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांनी मराठा बांधवांना आंदोलन न करण्याचं आवाहन केलं आहे.

Maratha Reservation  : मराठा बांधवांनो, सरकार तुमच्यासोबत, आंदोलन करू नका - मुख्यमंत्री
SHARES

मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात तात्पुरती स्थगिती मिळाल्यानंतर राज्यात मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. राज्यभरात मराठा संघटनांनी आंदोलनं पुकारली आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेला संबोधित केले.

मुख्यमंत्र्यांनी मराठा बांधवांना आंदोलन न करण्याचं आवाहन केलं आहे. ते म्हणाले की, मराठा बंधु-भगिनींनो, तुमची बाजू सरकार आक्रमकपणे मांडत आहे, जेष्ठ विधीज्ञांसोबत चर्चा करत आहोत. तुम्ही आंदोलनं जरूर करा परंतु कोणाच्या विरोधात? सरकार तर तुमच्यासोबतच आहे. आंदोलनांची आवश्यकता नाही. कारण तुम्हाला न्याय मिळवून देण्यास सरकार वचनबद्ध आहे, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, विरोधी पक्ष नेत्यांसोबतही माझं बोलणं झालं आहे. ते आत्ता बिहारला आहेत. ते देखील म्हणाले आहेत की आम्ही सरकारसोबत आहोत. मोठ्या बेन्चकडे जायला परवानगी दिली त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो. अनाकलनीय पद्धतीनं आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी स्थगिती दिली आहे. त्याबद्दल आपण चर्चा करत आहोत.

हेही वाचा : समाजात तणाव निर्माण होऊ न देणं हे विरोधकांचही कर्तव्य- संजय राऊत

मराठ्यांच्या आरक्षणाची लढाई आपण एकत्र लढलो. सर्वपक्षीय एकत्र लढलो. पूर्वीच्या सरकारचे कोणतेही वकील बदलले नाहीत, उलट अधिक वकील दिले. कोर्टात आर्ग्युमेन्ट करायला कमी पडलो नाही, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे विरोधकांकडून आता महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य करण्यात येऊ लागलं आहे. या स्थगितीमुळे मराठा समाजाच्या सर्वांगिण उन्नतीसाठी जे प्रयत्न केले, त्यावर पाणी फेरलं गेलं आहे. 

या सरकारनं सर्वांना विश्वासात घेऊन योग्य कारवाई केली असती, तर आरक्षण राखता आलं असतं. पण हे सरकार सुरूवातीपासूनच आरक्षणाच्या प्रश्नावर गंभीर नव्हतं. त्याचा परिणाम आपल्यासमोर आहे, असं म्हणत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. 

मराठा आरक्षणासंबंधीत याचिकांवर बुधवार ९ सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत नोकरी आणि शैक्षणिक प्रवेशासाठी सध्या (सन २०२०-२०२१) मराठा आरक्षण लागू करता येणार नाही. मात्र, याआधी देण्यात आलेल्या पदव्युत्तर प्रवेशांमध्ये बदल करण्यात येऊ नये, असा अंतरिम आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. शिवाय या प्रकरणाची सुनावणी मोठ्या खंठपीठाकडे सोपवण्याचा निर्णय देखील न्यायालयाने दिला आहे.



हेही वाचा

Maratha Reservation: सरकारला मराठा आरक्षण कायम राखता आलं असतं, पण…

Maratha Reservation: मराठा समाजाला भडकविण्याचं काम कुणी करू नये- उद्धव ठाकरे

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा