Advertisement

समाजात तणाव निर्माण होऊ न देणं हे विरोधकांचही कर्तव्य- संजय राऊत

समाजात तणाव निर्माण होऊ न देणं हे सत्ताधाऱ्यांइतकंच विरोधकांचही कर्तव्य, असल्याचं शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी सांगितलं.

समाजात तणाव निर्माण होऊ न देणं हे विरोधकांचही कर्तव्य- संजय राऊत
SHARES

आक्षेपार्ह व्यंगचित्र फॉरवर्ड केलं म्हणून माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शुक्रवारी शिवसैनिकांकडून मारहाण करण्यात आली. त्यावरून सध्या विरोधकांनी सत्ताधारी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आगपाखड सुरू केली आहे. त्यावर शिवसेनेची बाजू मांडताना समाजात तणाव निर्माण होऊ न देणं हे सत्ताधाऱ्यांइतकंच विरोधकांचही कर्तव्य, असल्याचं शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. (shiv sena mp sanjay raut clarifies over retired navy officers beaten up case in kandivali)

खासदार संजय राऊत यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे की, महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे. कायदा हातात घेणारे कोणीही असले, तरी त्यांची गय केली जाणार नाही. हेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं धोरण आहे. मुंबईत काल एका माजी नौदल अधिकाऱ्यावर हल्ला झाला. त्या अधिकाऱ्याने राज्याच्या मुख्यमंत्र्यांबाबत प्रसारीत केलेलं व्यंगचित्र बदनामीकारक असलं, तरी त्यांच्यावर झालेला हल्ला म्हणजे शिवसैनिकांची संतप्त तितकीच उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. तरीही हल्लेखोरांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा- तुम्हाला जमत नसेल तर राजीनामा द्या, माजी नौदल अधिकाऱ्यांचा उद्धव ठाकरेंवर संताप

विरोधी पक्षाने या घटनेचं राजकीय भांडवल करावं, हे दुर्दैवी आहे. संयम दोन्ही बाजूंनी पाळला गेला पाहिजे. पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री या घटनात्मक पदांबाबत टोकाची टीका करताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार झाला, तर लोकांच्या संयमाचा बांध तुटतो. म्हणून सगळ्यांनीच जबाबदारीने एकमेकांचा आदर ठेवून वागण्याची ही वेळ आहे. समाजात अशांतता आणि तणाव निर्माण होऊ न देणं हे हे सत्ताधाऱ्यांइतकंच विरोधकांचही कर्तव्य आहे, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. 

दरम्यान, मदन शर्मा यांना शनिवारी रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली. 

मी जखमी आहे तसंच तणावाखाली देखील आहे. माझ्यासोबत जे काही घडलं, ते अतिशय दु:खद आहे. उद्धव ठाकरे तुम्ही कायदा-सुव्यवस्था सांभाळू शकत नसाल, तर राजीनामा द्या, लोकांना ठरवू द्या की कुणी ही जबाबदारी सांभाळावी. ते मला, माझ्या मुलांना आणि नुकसान पोहचवू शकतात. त्यामुळे माझ्या कुटुंबाला संरक्षण देण्याची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, अशी मागणी देखील मदन शर्मा यांनी केली. 

मदन शर्मा हे कांदिवलीच्या समतानगर परिसरातील सोसायटीत आपल्या कुटुंबियांसोबत राहतात. काही दिवसांपासून टिव्हीवर कंगना आणि शिवसेना नेते असा वाद सुरू होता. या वादातून कंगनाच्या कार्यालयावर महापालिकेने कारवाई केल्याचं म्हटलं जात आहे. अशातच मदन शर्मा यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं एक व्यंगचित्र सोशल मीडियावर टाकलं होतं.

हेही वाचा-  निवृत नौदल अधिकाऱ्याला शिवसैनिकांची मारहाण, ‘उद्धवजी गुंडाराज थांबवा’ - फडणवीस

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा