Advertisement

शरद पवार सगळ्या विषयांवर बाेलतात, पण मराठा आरक्षणावर गप्प का?

पवार साहेब सगळ्या विषयांवर बोलतात; मात्र अजूनपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल त्यांनी एक चकार शब्द काढलेला नाही, असं म्हणत भाजप नेते निलेश राणे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केलं आहे.

शरद पवार सगळ्या विषयांवर बाेलतात, पण मराठा आरक्षणावर गप्प का?
SHARES

पवार साहेब सगळ्या विषयांवर बोलतात; मात्र अजूनपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल त्यांनी एक चकार शब्द काढलेला नाही, असं म्हणत भाजप नेते निलेश राणे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केलं आहे. पवार यांनी मराठा आरक्षणाच्या विषयावर अद्याप एकही बैठक का घेतली नाही, असा प्रश्न देखील राणे यांनी उपस्थित केला आहे. (bjp leader nilesh rane criticised ncp chief sharad pawar over maratha reservation)

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यास शरद पवार इच्छुक नसल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून केला जात आहे. त्यात भर टाकताना निलेश राणे यांनी ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये ते म्हणतात की, पवार साहेब सगळ्या विषयांवर बोलतात, पण अजूनपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल एक चकार शब्द काढलेला नाही. जशी मुस्लिम समाजाच्या एका सणासाठी पवार साहेबांनी मुंबईत येऊन बैठक घेतली होती तशीच बैठक मराठा समाजासाठी का घेतली नाही??

हेही वाचा - शरद पवारांकडून ‘ती’ अपेक्षाच नाही, चंद्रकांत पाटील यांची टीका

निलेश राणे यांनी अशोक चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.जवळपास ३/४ दिवस झाले तरी अजून महाराष्ट्र सरकार मराठा आरक्षणाबद्दल काय भूमिका घेणार हे स्पष्ट करत नाहीय. आम्हाला अशोक चव्हाण यांचा कामाचा अनुभव आहे. ते कधीच कुठलंही काम वेळेत करू शकत नाही व पूर्णत्वास नेऊ शकत नाही. त्यावर मुख्यमंत्र्याचं काम शून्य. ह्यांना झटका द्यावाच लागेल, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे. 

त्याआधी, शरद पवार मराठा समाजाला आरक्षण मिळवून देतील ही अपेक्षा त्यांच्याकडून नाही. त्यामागचं कारण म्हणजे मागील ५० वर्षांपासून राजकारणात असलेल्या शरद पवारांना ते करता आलं असतं. परंतु त्यांचा पक्ष सलग १५ वर्षे सत्तेत असूनही त्यांना मराठा आरक्षण देता आलेलं नाही. त्यांनीच तुम्ही स्थापन केलेल्या बापट समितीने मराठा समाजाला मागास म्हटलं होतं. त्यावर मतदान देखील झालं होतं, परंतु मतदानात हा अहवाल फेटाळण्यात आला. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीआधी घाईघाईने राणे समितीच्या आधारावर आरक्षण देण्यात आलं. मात्र हे आरक्षण न्यायालयात टिकलं नाही, असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. 

हेही वाचा - Maratha Reservation : मराठा बांधवांनो, सरकार तुमच्यासोबत, आंदोलन करू नका - मुख्यमंत्री

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा