वयोवृद्ध महिलेची हत्या करणारे आरोपी जेरबंद


वयोवृद्ध महिलेची हत्या करणारे आरोपी जेरबंद
SHARES

पश्चिम बंगाल येथे ६४ वर्षाच्या वृद्ध महिलेवर बलात्कार आणि तिची हत्या करून मुंबईला पळून आलेल्या दोन सर्राईत आरोपींना आझाद मैदान येथील माता रमाबाई मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. शुभंकर दोलोही सिखदर (३७) आणि गोविंदू हरिपोडू साराकर (२८) अशी या आरोपींची नावं आहेत. लवकरच या दोघांना पश्चिम बंगाल पोलिसांच्या ताब्यात दिलं जाणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.


संपूर्ण प्रकार

मूळचे पश्चिम बंगालच्या राणाघाट परिसरातील नादीया येथे राहणारे शुभंकर आणि गोविंदू हे बंगालमध्ये कडियाचं काम करतात. ८ मे रोजी रात्री काम संपल्यानंतर हे दोघे मद्यपान करण्यासाठी वृद्ध महिलेच्या घराच्या मागच्या बाजूस बसले होते. मद्यपान केल्यानंतर हात धुण्यासासाठी हे वृद्ध महिलेच्या घराजवळ आले. त्यावेळी घरात वृद्धमहिला ही एकटीच होती. हे दोघे आरोपी नळाखाली हात धुतल्याच्या कारणावरून वृद्ध महिला त्यांना ओरडली. त्यावेळी राग अनावर झालेल्या दोघांपैकी एकाने महिलेच्या कानशिलात वाजवली. त्यावेळी वृद्ध महिला बेशुद्ध पडली. त्यानंतर दोघांनी तिच्यावर बलात्कार करून तिची गळादाबून हत्या केली. मात्र प्राथमिक माहितीत नादिया पोलिसांनी या दोघांविरोधात फक्त हत्येचा गुन्हा नोंदवला होता.


गुन्ह्याची दिली कबुली

पोलिस मागावर असल्याचं कळल्यानंतर हे दोघे मुंबईला पळून आले होते. मुंबईच्या लायन गेट परिसरात राहणाऱ्या आपल्या एका सहकाऱ्याकडे ते पैशाची मागणी करत होते. याबाबत माता रमाबाई मार्गच्या पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी या दोघांना अटक केली. मुंबई पोलिसांनी खाकीचा धाक दाखवल्यानंतर दोघांनी हत्येसह बलात्कार केल्याची कबुली दिल्याची माहिती एमआरए पोलिसांनी दिली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा