रथाची चांदी चोरणारा गजाआड

बोरीवली - संभवनाथ जैन मंदिरातील चांदीच्या रथाची चोरी करणाऱ्या मंदिराच्या ट्रस्टीला पोलिसांनी अटक केली आहे. महेंद्र जैन असं या ट्रस्टीचं नाव असून, त्याला 26 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. महेंद्र जैन याच्या देखरेखीखाली असलेल्या रथाची चांदी तो मागील तीन वर्षांपासून थोडी थोडी काढून त्याची विट बनवत असे आणि याचा मागमूसही कोणाला लागला नाही. अखेर त्याची ही चोरी उघड झाली आणि त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सुमारे 330 किलो वजनाची आणि 1 कोटी 85 लाखांची चांदी चोरल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Loading Comments