पुन्हा झाली पोलीस शिपायाला मारहाण

 Ramtekdi
पुन्हा झाली पोलीस शिपायाला मारहाण

चेंबूर - भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलीस शिपायाला दारुड्याने मारहाण केल्याची घटना रविवारी मध्यरात्री चेंबूरच्या रामटेकडी परिसरात घडली. काशिनाथ गोंधडे असे या पोलीस शिपायाचे नाव असून ते आरसीएफ पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. रामटेकडी परिसरातील बीट चौकीमध्ये ते कार्यरत असताना बाजूलाच रामनाथ सोनी (42) हा दारूडया रस्त्याच्या मधोमध उभा राहून शिवीगाळ करत होता. दरम्यान गोंधडे हे आरोपीला समजावण्यासाठी गेले असता त्याने धोंडगे यांना मारहाण केली. ही बाब गोंधडे यांनी आरसीएफ पोलीस ठाण्यात कळवली असता तात्काळ पोलिसांनी या आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

Loading Comments