कुर्लामध्ये साप चावल्याने पोलिसाचा मृत्यू

रविवारी रात्री घरात झोपेत असताना साडेतीनच्या सुमारास अचानक सुनील भगत यांची प्रकृती बिघडली. त्यांनी पत्नीला उठवून पाणी मागितले.

कुर्लामध्ये साप चावल्याने पोलिसाचा मृत्यू
SHARES

कुर्लामधील नेहरूनगर येथील पोलीस वसाहतीत साप चावल्याने एका पोलीस शिपायाचा मृत्यू झाला. सुनील भगत (वय ३५) असं मृत पोलिसाचं नाव आहे. सुनील भगत पुणे पोलीस दलात कार्यरत होते.

भगत यांची पत्नी समृद्धीदेखील पोलीस दलात आहेत. त्या देवनार पोलीस ठाण्यात महिला पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. नेहरूनगर पोलीस ठाण्याच्या बाजूला असलेल्या पोलीस वसाहतीमध्ये मागील दोन वर्षांपासून सुनील भगत पत्नी समृद्धी आणि मुलासह राहत आहेत. रविवारी रात्री घरात झोपेत असताना साडेतीनच्या सुमारास अचानक सुनील भगत यांची प्रकृती बिघडली. त्यांनी पत्नीला उठवून पाणी मागितले. पत्नी पाणी आणण्यासाठी स्वयंपाक घरात गेली तेव्हा तिथे त्यांना साप दिसला.

 समृद्धी यांनी  नेहरूनगर पोलिसांच्या मदतीने सुनील यांना शीव रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. सर्पमित्र सुनील कदम यांच्या मदतीने घरातील साप पकडला.



हेही वाचा  -

आता मुंबई पोलिस घालणार घोड्यावरून गस्त




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा