आता मुंबई पोलिस घालणार घोड्यावरून गस्त

ब्रिटिश काळात मुंबईतील रस्त्यांवर घोडय़ांवर स्वार झालेले पोलीस पेट्रोलिंग करताना दिसायचे. पण कालांतरानं ही ही परंपरा बंद झाली. मात्र आता पुन्हा हे पथक पोलीस दलात दाखल होणार आहे.

आता मुंबई पोलिस घालणार घोड्यावरून गस्त
SHARES

पोलीस दल आता मुंबईच्या रस्त्यावर गस्त घालण्यासाठी घोड्यांचा वापर करणार आहेत. 'माऊंट हेड' नावाचं पथक लवकरच मुंबई पोलिस दलात सामील होणार आहे. सुमारे ३० घोड्यांचा या पथकात समावेश असेल. येत्या प्रजासत्ताक दिनी म्हणजेच २६ जानेवारीला पोलिसांचे हे पथक संचलनातही सहभागी होण्याची शक्यता आहे.

घोड्यावर स्वार पोलिस

ब्रिटिश काळात मुंबईतील रस्त्यांवर घोडय़ांवर स्वार झालेले पोलिस पेट्रोलिंग करताना दिसायचे. पण कालांतरानं ही ही परंपरा बंद झाली. मात्र आता पुन्हा हे पथक पोलिस दलात दाखल होणार आहे. मुंबईतील अनेक भागांमध्ये पोलिसांना गाड्या फिरवणं शक्य होत नाही. त्यामुळे पोलिसांना या भागात गस्त घालताना अडचणी येतात. अशा परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्था राखताना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागते. यासाठीच घोड्यावर स्वार पोलिसांचं पथक बनवण्यात आलं आहे.

१३ घोड्यांची खरेदी

 मुंबई पोलिसांना ३० घोड्यांचा समावेश असलेले एक पथक बनवण्यासाठी मान्यता मिळाली आहे. पण सध्या पोलिसांनी १३ घोडे खरेदी केले आहेत. यात थ्रो बिड या विदेशी प्रजातीच्या ७ घोड्यांचा तर ६ देशी घोड्यांचा समावेश आहे. या घोड्यांना कर्जत इथल्या सनी बुक फार्म इथं प्रशिक्षण देण्यात येतंय. त्यानंतर ते मुंबईत दाखल होतील. यासाठी केंद्र सरकारनंदीड कोटी मंजूर केले आहेत. 


पोलिसांना प्रशिक्षण

पोलिस अधिकाऱ्यांना देखील घोड्यांवर बसून कशाप्रकारे गस्त घालता येते याचं प्रशिक्षण देण्यात येतंय.  यासाठी पथकात एक पोलीस निरीक्षक आणि एक पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांसह २५ अंमलदारांचा समावेश आहे. यांचं प्रशिक्षण सध्या सुरू आहे.


समुद्रकिनारी गस्त घालणं सोपे

मुंबईतील समुद्रकिनारे जसे की जुहू, गिरगाव, मार्वे आदी ठिकाणी प्रशस्त मोठ्या समुद्रकिनाऱ्यांवर सर्वत्र लक्ष ठेवणं पोलिसांना कठीण जाते. अशा वेळी घोड्यावरून तात्काळ जाणं पोलिसांना शक्य होईल. याशिवाय सणासुदिच्या काळात गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी या पथकाची मदत होईल



हेही वाचा

अरुण गवळीची जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाकडून कायम

पत्नीने घर सोडल्याने दोन मुलांसह स्वतःचं संपवलं जीवन

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा