पत्नीने घर सोडल्याने दोन मुलांसह स्वतःचं संपवलं जीवन

दिनेश आणि त्यांची पत्नी यांचं ५ दिवसांपूर्वी भांडण झालं होतं. त्यावेळी पत्नी घर सोडून गेली. दोघांमध्ये नेहमीच वाद होत होते.

SHARE

 दोन मुलांची हत्या करुन स्वतःचंही जीवन संपवल्याची धक्कादायक घटना चेंबूर येथे उघडकीस आली आहे.  प्लंबर म्हणून काम करणारे दिनेश यादव यांनी आपल्या ३ महिन्याच्या मुलीची आणि दीड वर्षाच्या मुलाची हत्या केली. दोघांच्या हत्येनंतर त्यांनीही गळफास घेऊन आत्महत्या केली.

पत्नी घर सोडून गेल्यामुळे त्यांनी रागाच्या भरात हे कृत्य केल्याचं समोर आलं आहे. रात्री ११ ते सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास हत्या झाली असून त्यावेळी दरवाजा आतून बंद करण्यात आला होता. पत्नी वारंवार घर सोडून जात असल्याने दिनेश यादव मानसिकरित्या त्रस्त होते अशी माहिती पोलिसांनी दिली. दिनेश आणि त्यांची पत्नी यांचं ५ दिवसांपूर्वी भांडण झालं होतं. त्यावेळी पत्नी घर सोडून गेली. दोघांमध्ये नेहमीच वाद होत होते. भांडण झाली की पत्नी घर सोडून निघून जायची. त्यामुळे दिनेश तणावाखाली होते. 

रविवारी घराचा दरवाजा आतून बंद असल्याने शेजारी राहणाऱ्या भावाने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडला. यावेळी मुलं बेडवर मृतावस्थेत पडलेली होती. तर दिनेश यादव यांनी दुपट्ट्याने गळफास घेतल्याचं दिसून आलं.  मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दिनेश यांनी गळा दाबून मुलांची हत्या केल्यानंतर आत्हमत्या केली असावी असा पोलिसांना संशय आहे.  हत्येचं कारण जाणून घेण्यासाठी कुटुंबियांचा जबाब नोंदवू, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.हेही वाचा  -

चेेंबूरमध्ये बहिणीने केली भावाची हत्या

त्रासाला कंटाळून दोन बायकांकडून नवऱ्याची हत्या
संबंधित विषय
ताज्या बातम्या