टँकरच्या धडकेत पोलीस शिपायाचा मृत्यू

 Chunabhatti
टँकरच्या धडकेत पोलीस शिपायाचा मृत्यू

चुनाभट्टी - पत्नीसह मोटारसायकलवरून जात असलेल्या पोलीस शिपायाचा टॅंकरच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चुनाभट्टी परिसरात घडली. या अपघाता प्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी टँकरचालक शिवचरण सिंह (21) याला अटक केली आहे.

गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट चारमध्ये कार्यरत असलेले पोलीस शिपाई प्रताप किसन चव्हाण (45) हे रविवारी संध्याकाळच्या दरम्यान पत्नी प्रणिता चव्हाणसोबत त्यांच्या मोटारसायकलवरून सायनच्या दिशेने निघाले होते. तेव्हा वडाळ्याकडे जाणाऱ्या सायन ट्राॅम्बे दक्षिण वाहिनीजवळ त्यांच्या उजव्या बाजूने भरधाव वेगाने जाणाऱ्या टँकरने जोरदार धडक दिली. तेव्हा मोटारसायकलवरील चव्हाण पत्नीसह खाली कोसळले. तर टँकरचालक शिवचरण सिंह याने तेथून पळ काढला.

अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रताप चव्हाण आणि त्यांची पत्नी प्रणिता यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र चव्हाण यांचा उपचारापूर्वीच मृत्यु झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. चुनाभट्टी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद करून आरोपी शिवचरण सिंह याला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.

Loading Comments