वडाळा टीटी पोलिसांची कारवाई

 wadala
वडाळा टीटी पोलिसांची कारवाई

वडाळा टीटी - निवडणुकीच्या तोंडावर सुरू असलेल्या प्रतिबंधित कारवाईत 200 पेक्षा जास्त गुन्हेगारांवर कारवाई करण्यात वडाळा टीटी पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत काही गुन्हेगारांना तडीपार करण्यात आलं. तर कित्येकांचा बॉण्ड भरण्यात आला आणि काही गुन्हेगारांना स्थानबद्ध करण्यात आलं. या कारवाईमुळे स्थानिक गुन्हेगारांचे चांगलेच धाबे दणाणले असून पोलिसांच्या धडक कारवाईचा धसका बसल्याने गुंडांची धावपळ सुरू झाली आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सर्वात मोठी लक्षवेधी कारवाई केली आहे. वडाळा टीटी हद्दीतील 200 पेक्षा जास्त गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर सुरू असलेले प्रकरण पाहून तडीपार, स्थानबद्ध तसेच त्यांच्याकडून बॉण्ड भरून घेण्यात आले आहेत. यामुळे निवडणूक प्रक्रियेतील मोठा अडसर दूर झाला आहे. ही कारवाई निवडणूक अचारसंहिता संपेपर्यंत सुरू राहणार असल्याचे वडाळा टीटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील कांबळे यांनी संगितलं.

Loading Comments