'त्या' फोटोत दडलंय कृतिकाच्या हत्येचे गूढ?

 Mumbai
'त्या' फोटोत दडलंय कृतिकाच्या हत्येचे गूढ?
Mumbai  -  

स्ट्रगलिंग अॅक्ट्रेस आणि मॉडेल कृतिका चौधरी हिच्या हत्येला दोन दिवस उलटून देखील पोलिस हत्येचे गूढ सोडवू शकलेले नाहीत. मात्र आरोपीच्या जवळ पोहोचल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, पोलिसांच्या हाती एक असा फोटो लागला आहे जो या हत्येचे गूढ सोडवू शकतो. सांगितले जातेय की, 5 जूनला कृतिकाचा वाढदिवस होता आणि त्याची पार्टी तिच्याच घरी ठेवण्यात आली होती. याच पार्टीत काढण्यात आलेला एक फोटो पोलिसांना मिळाला असून, या फोटोमध्ये कृतिकाचा मारेकरी दिसत असल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे. अद्याप हा इसम कोण होता ते मात्र सांगण्यास पोलिस तयार नाहीत.


हेही वाचा - 

अंधेरीत मॉडेलची धारदार शस्त्राने हत्या

अंधेरीत मॉडेलची धारदार शस्त्राने हत्या


12 तारखेच्या संध्याकाळी चार बंगला येथील भैरवनाथ सोसायटीमधील पाचव्या मजल्यावरील घरात कृतिकाचा मृतदेह सापडला होता. या प्रकरणी पोलिसांनी इमारतीच्या समोरील किराणामालाच्या दुकानातील तसेच साईबाबांच्या मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतली आहेत. मात्र ही सीसीटीव्ही फुटेज तितकीशी स्पष्ट नसल्याचे समजतेय. या हत्येचा तपास करण्यासाठी पोलिसांनी चार टीम बनवल्या आहेत. गुन्हे शाखा देखील या हत्येचा समांतर तपास करतेय.

Loading Comments