अंधेरीत मॉडेलची धारदार शस्त्राने हत्या

 Andheri
अंधेरीत मॉडेलची धारदार शस्त्राने हत्या
Andheri, Mumbai  -  

अंधेरीतील चार बंगला परिसरात सोमवारी सायंकाळी 7 वाजता 24 वर्षीय मॉडेल, अभिनेत्री कृतिका चौधरी हिचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी आंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळची हरिद्वार येथे राहणारी कृतिका अंधेरीतील चार बंगला येथील भैरवनाथ एसआरए इमारतीत राहात होती. अज्ञात व्यक्तीने तीन ते चार दिवसांपूर्वी धारदार शस्त्राने तिची हत्या केल्याचे दिसत आहे. हत्येनंतर हल्लेखोर दरवाजा बाहेरुन बंद करून फरार झाला. कृतिकाने सावधान इंडिया सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.

झोन - 5 चे डीसीपी परमजीत सिंह दाहिया यांनी सांगितले की, पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी पाठवला आहे. अहवाल आल्यानंतरच पुढील बाबी स्पष्ट होतील. या प्रकरणी आंबोली पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

Loading Comments