संदीप नाहरची पत्नी आणि सासू विरोधात गुन्हा दाखल

संदीप नाहार याने आपल्या सुसाईड नोटमध्ये आपल्या वैवाहिक जीवनात असणाऱ्या अडचणींचा उल्लेख केला होता.

संदीप नाहरची पत्नी आणि सासू विरोधात गुन्हा दाखल
SHARES

अभिनेता संदीप नाहार (Sandeep nahar) याच्या आत्महत्या (Suicide) प्रकरणी पोलिसांनी संदीपची पत्नी कंचन शर्मा आणि सासूविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

संदीप नाहार याने आपल्या सुसाईड नोटमध्ये आपल्या वैवाहिक जीवनात असणाऱ्या अडचणींचा उल्लेख केला होता. शिवाय त्याने आत्महत्येपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ देखील पोस्ट केला होता.

आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप दोघींवर लावण्यात आला आहे. याप्रकरणी याशिवाय आत्महत्येचा व्हिडीओ पाहिल्यानंतर सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी या अभिनेत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केल्याचं सांगण्यात येत आहे. परंतु त्याला शोधेपर्यंत संदीप नाहारनं आत्महत्या केली होती.

संदीप नाहारनं आत्महत्येपूर्वी आपल्या फेसबुक अकाऊंटवर सुसाइड नोट पोस्ट केली आहे. त्यानं या पोस्टमध्ये लिहिलं की, 'आता जगण्याची इच्छा नाही. आयुष्यात बरीच सुख-दु:ख पाहिली आहेत. प्रत्येक समस्याचा दटून सामना केला आहे. परंतु आज मी ज्या मानसिक स्थितीतून जात आहे, ते सहन होण्यापलिकडचं आहे. मला माहित आहे की, आत्महत्या हा भ्याडपणा आहे. मलाही जगायचं होतं पण जिथे मनाला शांतता आणि आत्मसन्मान नाही, अशा परिस्थितीत जगून काय फायदा?

संदीपने सुसाईड नोटमध्ये पत्नी कंचन शर्मा आणि सासू विनू शर्मा यांच्याविरूद्ध बर्‍याच गंभीर बाबी उघड केल्या आहेत. संदीपनं लिहिलं की, 'कंचनशी लग्न केल्यानंतर माझं आयुष्य नरकमय झालं. कंचन आणि तिची आई छोट्या छोट्या विषयावरून मानसिक त्रास देत होते. माझ्या मृत्यूनंतर कंचनला कोणीही काहीही बोलू नका.

संदीपच्या मृत्यूनंतर बॉलीवूडच्या अनेक बड्या कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे. हमसफर है, एमएस धोनी, केसरी यांसारख्या प्रसिद्ध चित्रपटांत संदीप नाहरनं भूमिका साकारली होती. सोमवारी त्याचा मृतदेह राहत्या घरी सापडला होता, त्यानं आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे.



हेही वाचा

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा