अफवा पसरवणाऱ्या 207 जणांना आतापर्यंत पोलिसांनी केली अटक


अफवा पसरवणाऱ्या 207 जणांना आतापर्यंत पोलिसांनी केली अटक
SHARES
लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये,काही गुन्हेगार व समाजकंटक  गैरफायदा घेत अफवा पसरवण्याचा प्रयत्न करत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने  कठोर पाऊले उचलली असून राज्यात 379 गुन्हे विविध पोलिस ठाण्यात आतापर्यंत दाखल केले आहेत. त्यापैकी 16 गुन्हे अदखलपात्र (N.C)आहेत. या गुन्ह्यात पोलिसांनी आतापर्यंत 207 जणांना अटक केली आहे.


 व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी 162 गुन्हे दाखल झाले आहेत,तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी 148 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ,titktok विडिओ शेअर प्रकरणी 16 गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी 7 गुन्हे दाखल झाले आहेत, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी 4 गुन्हे दाखल झाले आहेत .तर अन्य सोशल मीडियाचा ( ऑडिओ क्लिप्स, youtube) गैरवापर केल्या प्रकरणी 42 गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत 207 आरोपींना अटक केली आहे . तर यापैकी 102 आक्षेपार्ह पोस्ट्स takedown करण्यात यश आले आहे.

त्यामध्ये बीड 37 ,पुणे ग्रामीण 30, जळगाव 26, मुंबई 21, कोल्हापूर 16, नाशिक ग्रामीण 16, सांगली 14, ठाणे शहर 13, बुलढाणा 12, जालना 12, नाशिक शहर 11, नांदेड 11, सातारा 10, पालघर 10, लातूर 10, नागपूर शहर 9, नवी मुंबई 9, परभणी 8, सिंधुदुर्ग 7, अमरावती 7, ठाणे ग्रामीण 7, हिंगोली 6, गोंदिया 5, सोलापूर ग्रामीण 5, पुणे शहर 4, रत्नागिरी 4 ,सोलापूर शहर 4, नागपूर ग्रामीण 4, भंडारा 4, पिंपरी- चिंचवड 4, अमरावती ग्रामीण 4, चंद्रपूर 4, अहमदनगर 4, धुळे 3,रायगड 2, धुळे 2, वाशिम 2, यवतमाळ 1,औरंगाबाद 1 (एन.सी), यवतमाळ 1 यांचा प्रामुख्याने समावेश आहे .

ऑनलाईन व्यवहारात सावध राहा

सध्या लॉकडाउनच्या काळात , सरकारने ऑनलाईन मद्य खरेदीला व डिलिव्हरीला सशर्त परवानगी दिली आहे .महाराष्ट्र सायबर विभागामार्फत आवाहन करण्यात येते की, जर तुम्हाला मद्य खरेदी करायचेच असल्यास सदर अँप किंवा वेबसाईट  वापरण्यासाठी सुरक्षित आहे याची  खात्री करा व मगच  वापरा ,तसेच कुठल्याही अँपवर शक्यतो आपला बँक खात्याचा नंबर ,डेबिट /क्रेडिट कार्ड नंबर व त्यांचे पिन नंबर सेव करू नका. शक्यतो cash on delivery चा पर्याय ऑर्डर बुक करताना निवडा . जर अशा वेबसाईट किंवा अँपवर तुम्ही फसविले गेले असाल तर त्याची तक्रार जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये नोंद करा व www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर पण  नोंदवा . केंद्र व राज्य सरकार वेळोवेळी जे नियम व आदेश प्रसिद्ध करतील त्याचे पालन करा व गरज नसल्यास कृपया घराच्या बाहेर पडू नका 
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा