सुरक्षा रक्षकास मारहाण करून माजी नगरसेवक पसार


सुरक्षा रक्षकास मारहाण करून माजी नगरसेवक पसार
SHARES

दहीसरमध्ये जमीन हडपल्या प्रकरणी एकीकडे माजी नगरसेवक बिल्ला तुरुंगात असतानाच दुसरीकडे काँग्रेसच्या पूर्व नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. राम आशिष गुप्ता असं या माजी नगरसेवकाचे नाव असून, त्याच्यासह 7 जणांवर काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार 4 मे 2017 रोजी मीरारोड मधील मीरा गाव सर्व्हे नं 139/1 मध्ये बिल्डर किशोर शाह,राम आशिष गुप्ता(माजी काँग्रेस नगरसेवक), मदन गुप्ता, दुल्ला भाई बलदानिया,भोला, अमित परमार, आणि किरण ठाकुर यांनी सुरक्षा रक्षकास आणि तिथे राहणाऱ्यांना मारहाण केली. या प्रकरणी रहिवाशांनी पोलिसांना माहिती देताच हे सगळे जण पसार झाले. दरम्यान अरूण बिल्डर याच्या तक्रारीनंतर काशिमीरा पोलिसांना सर्व आरोपींवर 452,143,323,504,506 ,109,427 कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून, पोलीस या सगळ्यांचा शोध घेत आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा