पोलिसानंच भडकावली वकिलाच्या कानाखाली

 Kurar Village
पोलिसानंच भडकावली वकिलाच्या कानाखाली

कुरार - कुरार पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने एका वकिलाच्या कानशिलात लगावल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर पोलिसांनी फिर्यादी वकील दिलीप गुप्ता यांचा जबाब नोंदवत कारवाई सुरू केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अॅड. दिलीप गुप्ता हे गोरेगाव (प.) इथल्या जवाहरनगरमधील राहणारे आहेत. ते कलम 302 चे एक प्रकरण हाताळत होते. 26 मार्चला सकाळी त्यांच्या घरी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांसोबत दिलीप हे देखील कुरार पोलीस ठाण्यात गेले. तेव्हा दिलीप देखरेख करत असलेल्या प्रकरणाची माहिती तिथल्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने विचारली. मात्र आपल्याला त्याबद्दल काहीच माहीत नसल्याचे दिलीप यांनी सांगितले. त्यामुळे संतापलेल्या पोलीस अधिकाऱ्याने दिलीप यांच्या कानशिलात लगावत त्याना शिवीगाळ देखील केली. याची सूचना मिळताच वकिलांचा समूह पोलीस ठाण्याबाहेर जमला.

याची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त सुभाष वेले तिथे पोहचले. तेव्हा त्यांनी वकिलांशी बातचित करून योग्य कारवाई केली जाणार असल्याचं आश्वासन त्यांना दिलं. त्यासह फिर्यादी वकील दिलीप गुप्ता यांचा जबाब देखील नोंदवून घेतला..

Loading Comments