NCB पाठोपाठ मुंबई पोलिसांनी जप्त केले लाखोंचे ड्रग्ज

एनसीबीच्या झाडाझडतीनंतर आता पोलिसही कामाला लागले आहेत.

NCB पाठोपाठ मुंबई पोलिसांनी जप्त केले लाखोंचे ड्रग्ज
SHARES

नॉर्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) बॉलिवूडमधील अंमली पदार्थ तस्करीविरोधात चौकशीचा फास आवळला असतानाच आता मुंबई गुन्हे शाखेनेही अंमली पदार्थविरोधी मोहीम तीव्र केली आहे. आठवड्याभरात पोलिसांनी ठिकठिकाणी कारवाई करीत एमडी, कोकेन तसेच पार्टी ड्ग्जसह अनेकांची धरपकड केली आहे. विशेष म्हणजे वेगवगेळ्या कारवाईमध्ये अटक केलेल्या काहींचा बॉलिवूडशी कुठे ना कुठे संबंध येत असल्याचे समोर आले आहे. एनसीबीच्या झाडाझडतीनंतर आता पोलिसही कामाला लागले आहेत.

हेही वाचाः-अंबानी कुटुंबाला झेड प्लस सुरक्षा देण्यामागे फक्त ‘हेच’ कारण?

मुंबईच्या गुन्हे शाखा ४ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निनाद सावंत यांना काही दिवसांपूर्वी एक ड्रग्ज तस्कर पी डिमॅलो रोडवर ड्रग्जची तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून एका संशयिताला ताब्यात घेतले. सलीम शेख असे या आरोपीचे नाव आहे. पोलिसांना त्यांच्या अंग झडतीत १११ ग्रॅम हिराँईन जप्त केले आहे. ज्याची बाजारात किंमत २० लाख रुपये इतकी आहे. पोलिसांनी त्याला  न्यायालयात हजर केले असता. न्यायालयाने त्याला ३१ आँक्टोंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर दुसरीकडे मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विभागाच्या आझाद मैदान युनिटने वासिल खान मार्ग, टॅक स्ट्रिट येथून एका सराईत तस्कराला अटक कली आहे. २७ आँक्टोंबर रोजी हा आरोपी तस्करीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी सापळा रचला होता.

हेही वाचाः-'त्या' ट्रॅफिक हवालदाराचा भररस्त्यात महिला एसीपींकडून सन्मान

त्यानुसार ३०० ग्रॅम एमडीची तस्करी करताना पोलिसांनी त्याला रंगेहाथ अटक केली. बाजारात या ड्रग्जची किंमत ३०० लाख रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या सराईत आरोपी विरोधात या पूर्वी नागपाडा, जे.जे. मार्ग पोलिस, भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय