पोलिसांचे पगार जमा होणार एचडीएफसी बँकेत, मिळणार १ कोटीचं विमा कवच


पोलिसांचे पगार जमा होणार एचडीएफसी बँकेत, मिळणार १ कोटीचं विमा कवच
SHARES

महाराष्ट्रातील सत्तापालटाचा फटका ‘अ‍ॅक्सिस बँके’सारख्या खाजगी क्षेत्रातील देशात ‘टॉप 5’मध्ये असलेल्या बँकेलाही बसलाआहे. पोलिस विभागाची वेतन खाती (सॅलरी अकाऊण्ट्स) अ‍ॅक्सिस बँकेतून हलवून  एचडीएफसी बँककडे वर्ग केले आहेत.  जवळपास दोन लाख पोलिसांची अकरा हजार कोटी रुपयांची खाती एचडीएफसी बँकेकडे वळवण्यात आली आहे. त्याच बरोबर बॅंकतून त्यांना पोलिसांना १ कोटी विमा कवच आणि इतर सुविधा मिळणार आहे.

हेही वाचाः- सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकल: एक ते दोन दिवसांत निर्णय?

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना २०१५ साली अ‍ॅक्सिस बँकेत मुंबई पोलिसांचे पगार करण्याबाबत करार करण्यात आला होता. या कराराची मुदत ३१ जुलै २०२० रोजी संपली आहे. त्यानंतर राज्य सरकारने एचडीएफसी बॅंकेत पगार करण्याचा निर्णय घेतला. फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या अ‍ॅक्सिस बँकेत उच्च पदावर असल्याने २०१५ साली सरकारने पोलीसांचे पगार अ‍ॅक्सिस बँकेच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप तेव्हा विरोधकांनी केला होता. या पार्श्वभुमीवर अ‍ॅक्सिस बँकेंसोबतचा करार संपल्यानंतर नवी बँक निवडण्यासाठी पोलीस दलाने प्रस्ताव मागवले होते.

हेही वाचाः-  जी उत्तर विभागातील वरळी परिसर रुग्णसंख्येत शेवटच्या क्रमांकावर

एचडीएफसीने दिलेल्या प्रस्तावात पोलीसांना अधिक सुविधा मिळत असल्याने या बँकेची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. एचडीएफसी बँक पोलिसांनी १० लाख रुपयांचं विमा कवच देणार आहे.  नैसर्गिक किंवा कोविडमुळे मृत्यू झाल्यास १० लाखाचे विमा संरक्षण, अपघाती मृत्यू आल्यास १ कोटींपर्यंत विमा कवच, अपघातात विकलांग झाल्यास ५० लाख विमा कवच, अपघाती मृत्यूनंतर दोन अपत्यांना १० लाख शिक्षणासाठी, रुग्णालयात उपचारांसाठी भरती झाल्यास ३० दिवसांपर्यंत प्रति दिन १ हजार रुपये मदत अशा सुविधा मुंबई पोलीस दलातील कर्मचारी, अधिकार्‍यांना एचडीएफसी बँक देणार आहे. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय