वर्ल्डकप सामन्यावर सट्टा लावताना पोलिस उपनिरीक्षक अटकेत

पोलिसांची कारवाईने हाँटेलमध्ये एकच धावपळ सुरू झाली. त्यावेळी पोलिसांची नजर चुकवून त्या ठिकाणाहून पळ काढत असलेल्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या अंग झडतीत पोलिसांना त्याच्याजवळ १ लाख ९३ हजार रुपये आढळून आले.

वर्ल्डकप सामन्यावर सट्टा लावताना पोलिस उपनिरीक्षक अटकेत
SHARES

इंग्लडमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड कपच्या सामन्यावर सट्टा लावणाऱ्यांवर मंगळवारी माटुंगा पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी बुकींसह एका पोलिस उपनिरीक्षकाला सट्टा लावताना अटक केल्याने चर्चांना उधाण आलं आहे.  ज्ञानेश्वर खरमाटे असं या उपनिरीक्षकाचं नाव आहे. तर मिकीन शहा या बुकीसह मनिष सिंगप्रकाश बनकर यांनाही पोलिसांनी सट्टा खेळताना अटक केली. 


हाॅटेलमध्ये छापा

दादर रेल्वे स्थानक पुर्वेकडील रामी गेस्ट लाईन हॉटेलमध्ये काही जण स्ट्रेलिया आणि इंग्लडच्या सामन्यावर सट्टा लावत असल्याची माहिती माटुंग्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत भोईटे यांना मिळाली. त्यानुसार भोईटे यांनी पोलिस उपनिरीक्षक अमोल सावंत आणि मारुती शेळके यांच्या पथकाद्वारे सापळा रचला. मंगळवारी रात्री या हॉटेलच्या सातव्या मजल्यावरील खोलीत छापा टाकला. यावेळी स्ट्रेलिया आणि इंग्लडच्या सामन्यावर मिकीन शहा (३३) हा मोबाइलवरुन क्रिकेट बेटींग करत असताना पोलिसांना आढळून आला. त्याच्यासोबत त्यावेळी मनिष सिंग, प्रकाश बनकर हेही होते.


जामिनावर सुटका

पोलिसांच्या कारवाईने हाॅटेलमध्ये एकच धावपळ सुरू झाली. त्यावेळी पोलिसांची नजर चुकवून त्या ठिकाणाहून पळ काढत असलेल्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत १ लाख ९३ हजार रुपये आढळून आले. त्याच्या चौकशीत तो भायखळा पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असल्याचे उघडकीस आले.  न्यायालयाने चारही आरोपींची जामिनावर सुटका केल्याचे पोलिसांनी सांगितले.



हेही वाचा  -

विश्वासू शेजारणीनेच घात केला, घरात केली लाखोंची चोरी




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा