विश्वासू शेजारणीनेच घात केला, घरात केली लाखोंची चोरी

रुचिता ही कायम दोघांशी जवळीकता साधायची. याच दरम्यान दोन्ही दांपत्य व्यायामासाठी घराबाहेर असताना. त्यांच्या घरात अनोळखी चोरांनी चोरी केली. घरातून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि दिड लाख रुपयांची रोख रक्कम असा साडेसात लाख रुपयांचा मुद्देमाल चोरला होता.

विश्वासू शेजारणीनेच घात केला, घरात केली लाखोंची चोरी
SHARES

कांदिवलीतील एका वृद्धाशी जवळीक साधून घरी चोरी करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा ११ च्या पोलिसांनी अटक केली आहे. रुचिता सचिन तन्ना आणि दिपक हस्तीमल सरकारीया अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांकडून पोलिसांनी चोरीतील साडेपाच लाख रुपये हस्तगत केले आहेत.


बनावट चावीचा वापर

चारकोपच्या एका नामांकित सोसायटीत वयोवृद्ध पती-पत्नी राहतात. याच इमारतीत रुचिता राहत असून ती दोघांच्या परिचयाची आहे. रुचिता ही कायम दोघांशी जवळीकता साधायची.  काही  दिवसांपूर्वी दाम्पत्य व्यायामासाठी घराबाहेर असताना त्यांच्या घरात चोरी झाली. घरातून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि दीड लाख रुपयांची रोख रक्कम असा साडेसात लाख रुपयांचा मुद्देमाल चोरला होता. चोरट्यांनी चोरी करताना दरवाजाची कुलूप किंवा कडी तोडलेली नव्हती. त्यामुळे चोरट्यांनी बनावट चावीचा वापर करून फ्लॅटमध्ये प्रवेश केल्याचे निदर्शनास येत होते. त्यामुळे या चोरीत ओळखिच्या व्यक्तीचा हात असल्याचा संशय पोलिसांना सुरूवातीपासूनच होता.


खाकीचा धाक दाखवला 

या प्रकरणी वयोवृद्ध दांपत्यांनी चोरीची तक्रार चारकोप पोलिसात केली. गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन या गुन्ह्याचा तपास पुढे गुन्हे शाखा ११ च्या पोलिसांकडे देण्यात आला. चौकशी दरम्यान रुचिता पोलिसांना सहकार्य करत नव्हती. त्यामुळे पोलिसांना तिच्यावर संशय होता चौकशीत पोलिसांनी खाकीचा धाक दाखवला असता. रुचिताने बनावट चावी बनवून त्यांच्या घरी प्रवेश करून ही चोरी केल्याची कबुली दिली. तिने चोरीचे दागिने दिपक याला विकले होते. ते दागिने चोरी असल्याचे माहिती असतानाही त्याने खरेदी करुन तेे वितळून त्याची एक लगड बनवून घेतली होती. त्यामुळे त्यालाही या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केल्याची माहिती गुन्हे शाखा ११ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चिमाजी आढाव यांनी दिली.



हेही वाचा -

मेहुल चोक्सीची नागरिकता होणार रद्द, अँटिग्वा सरकारची घोषणा




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा