धारावीत गाड्यांची तोडफोड, 1 संशयित ताब्यात


धारावीत गाड्यांची तोडफोड, 1 संशयित ताब्यात
SHARES

धारावी - अण्णानगर परिसरातल्या लोकमान्य सोसायटीच्या पार्किंगमधल्या गाड्यांची तोडफोड केल्याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. मंगळवारी पहाटे 4 वाजता हातात लोखंडी रॉड घेऊन सहा सात हल्लेखोरांनी गाड्यांची तोडफोड केली होती. तसेच या वाहनांमधल्या किमती वस्तूंची चोरीही हल्लेखोरांनी केली होती. या घटनेत 3 मालवाहू टेम्पो, 3 कार आणि 1 नवीन बुलेट या गाड्यांचा समावेश आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हल्लेखोरांचे चेहरे स्पष्ट दिसत नाहीयेत. त्यामुळे शाहूनगर पोलिसांची शोध घेताना दमछाक होतेय.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा