रोड अपघातात पोलीस जखमी

  Mumbai
  रोड अपघातात पोलीस जखमी
  मुंबई  -  

  नागपाडा - कामावरुन घरी जात असताना भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीच्या धडकेत पोलीस शिपाई जखमी झाल्याची घटना नागपाड्यात घडली आहे. याप्रकरणी अल्पवयीन आरोपीला नागपाडा पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी विनापरवाना वाहन चालवत असल्याची माहिती नागपाडा पोलिसांनी दिलीय. मरोळ मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस शिपाई प्रितम मेढे या अपघातात जखमी झाले आहेत. कामावरून घरी जात असताना क्लेअर रोड मार्गावर एका अल्पवयीन तरुणाने त्यांना धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. स्थानिकांच्या मदतीने मेढे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. आरोपी विनापरवाना वाहन चालवित होता.निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.