हुक्का पार्लरविरोधात नागरिक एकवटले

 Malad West
हुक्का पार्लरविरोधात नागरिक एकवटले
हुक्का पार्लरविरोधात नागरिक एकवटले
हुक्का पार्लरविरोधात नागरिक एकवटले
हुक्का पार्लरविरोधात नागरिक एकवटले
See all

चिंचोली बंदर - येथील इन्फंट जेसस स्कूलशेजारी असलेल्या हुक्का पार्लर विरोधात स्थानिक नागरिक एकवटले आहेत. येथे आठ हुक्का पार्लर असून, या पार्लरना स्थानिक नागरिकांच्या चिंचोली बंदर एरिया वेल्फेयर असोसिएशनने विरोध केला आहे.

सोमवारी या असोसिएशनतर्फे विरोध प्रदर्शन मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेत स्थानिक २० ते ३० सोसायटीतील नागरिकांनी सहभाग घेतला. यावेळी स्थानिक सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी उपस्थित होते. हुक्का पार्लर हटावण्यासाठी पालिकेत तक्रार करण्यात आली असल्याचे स्थानिक नगरसेविका स्नेहा झगडे यांनी यावेळी सांगितले. या परिसरात दालमिया, बजाज कॉलेज, विद्या विकास कॉलेज आहे. त्यामुळे हुक्का पार्लर सुरू झाल्यास विद्यार्थ्यांवर वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हुक्का पार्लरला आमचा विरोध असल्याचे मनसे शाखाप्रमुख हरेश साळवी यांनी सांगितले.

Loading Comments