विमा कंपन्यांच्या फायद्यासाठी खटाटोप ?


विमा कंपन्यांच्या फायद्यासाठी खटाटोप ?
SHARES

नवीन मोटर वाहन दुरुस्ती विधेयकाला बार काउन्सिलने कडाडून विरोध केला आहे. विमा कंपनीच्या फायद्यासाठी केंद्र सरकार यांसंदर्भातले विधेयक मंजूर करू पाहत आहे. अशी टीका बार काऊन्सिल असोसिएशनचे गोव्याचे अध्यक्ष आर. आर. शिंगटे यांनी केली. नुकसानभरपाईची रक्कम ही मर्यादित असणार आहे. हे विधेयक मंजूर झाल्यास अपघातग्रस्त किंवा त्यांच्या वारसांना अतोनात नुकसान सोसावे लागणार आहे. असेही त्यांनी सांगितले. मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्र सरकारने हे विधेयक मंजुरीसाठी लोकसभेपुढे गेल्या आठवड्यात पटलावर ठेवले होते. यामध्ये गंभीर दुखापतीसाठी 5 लाख तर मृतांच्या वारसांना 10 लाख रुपयांची नुकसानभरपाईची मर्यादा घातलेली आहे. त्यामुळे या विधेयकाला विरोध असून यासंदर्भातले पत्र खासदारांना पाठवण्यात आली असल्याची माहती बार काऊन्सिलचे निमंत्रक विठ्ठल कोंडे यांनी दिली.  

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा