केकमधून ड्रग्सची विक्री करणाऱ्या डाॅक्टरला अटक

आरोपीे रहिम चारनिया माझगाव परिसरात ड्रग्जची तस्करी करत होता. याची माहिती एनसीबीला मिळाली होती.

केकमधून ड्रग्सची विक्री करणाऱ्या डाॅक्टरला अटक
SHARES

मुंबईत केकमधून ड्रग्सची विक्री करणाऱ्या डाॅक्टरला एनसीबीने अटक केली आहे. आरोपीचे नाव रहिम चारनिया असे आहे. आरोपी मानोसोपचार तज्ज्ञ होता. त्याने आपल्या घरात बेकरीचा धंदा सुरु केला होता. बेकरीच्या माध्यमातून हा आरोपी नशेचे केक बनवून विकत होता.

आरोपीे रहिम चारनिया माझगाव परिसरात ड्रग्जची तस्करी करत होता. याची माहिती एनसीबीला मिळाली होती.  एनसीबीने जाळे रचून या मानसोपच्चार तज्ज्ञ असलेल्या ड्रग्ज तस्कराला बेड्या ठोकल्या आहेत.

आरोपीकडून एनसीबीने 10 किलो वजनाचे केक जप्त केले आहेत. तसंच 320 ग्रॅम आफू, 50 ग्रॅम हाशिषसह तब्बल 1 लाख 72 हजार रुपये जप्त केले आरोपीने या नशायुक्त केकला हश ब्राऊनी असे नाव दिले होते. याच नावाने तो केक विकत होता. घरीच केक बनवून विकत असल्यामुळे त्याच्यावर फार कुणाचा संशय देखील येत नव्हता. आरोपी काही ड्रग्ज पेडलरकडून हे ड्रग्ज विकत घेत असून त्यापासून केक तयार करत होता.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा