वडाळ्यात शौचालय खचल्याने महिला जखमी


वडाळ्यात शौचालय खचल्याने महिला जखमी
SHARES

वडाळा - शौचालय खचून कोसळल्यानं चार महिला जखमी झाल्याची घटना वडाळ्याच्या कोरबा मिठागर इथल्या अंबिकावाडीत गुरुवारी दुपारी घडली. कोरबा मिठागर येथील अंबिका वाडी, गौतम नगर आणि बरकत अली नाका या ठिकाणी राहणाऱ्या साधारण 2 हजार रहिवाशांसाठी महानगर पालिकेच्या वतीने हे शौचालय बांधण्यात आलं होतं.

आठ वर्षांपूर्वी स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर यांनी म्हाडाच्या निधीतून या शौचालयाचं नूतनीकरण केलं. त्यानंतर महानगरपालिकेच्या वतीने स्थानिकांना कोणतीही पूर्व सूचना न देता एका खासगी संस्थेला भाढे तत्वावर ते चालवण्यासाठी दिले. त्यानुसार या संस्थेकडून शौचालयाच्या साफसफाईसाठी प्रत्येक घरामागे 70 रुपये प्रतिमहा आकारले जात असल्याचं मनसे शाखा अध्यक्ष संजय रणदिवे यांनी सांगितले. या शौचालयाची दुरवस्था झाल्याचं निदर्शनास आणून दिल्यानंतरही याकडे कुणीही लक्ष दिलं नसल्याचंही रणदिवे यांनी सांगितले. तर या संस्थेबाबत चर्चा करून घटनेची शहानिशा करण्यात येईल, असं पालिका एफ - उत्तर विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

संबंधित विषय