दादर रेल्वे स्थानकात 2 रिवॉल्व्हर आणि 22 जिवंत काडतुसं!

  Dadar
  दादर रेल्वे स्थानकात 2 रिवॉल्व्हर आणि 22 जिवंत काडतुसं!
  मुंबई  -  

  पंजाबहून आलेल्या एका प्रवाशाच्या बॅगेत दादर आरपीएफ जवानांना मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आढळून आला आहे. याबाबत दादर आरपीएफने या प्रवाशाला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

  असा झाला उलगडा?

  रवींद्र पवार असे या आरोपीचे नाव असून तो कुर्ला परिसरात राहणारा आहे. बुधवारी संध्याकाळी पंजाबहून आलेल्या पंजाब मेलमधून हा आरोपी बाहेर पडला. त्यानंतर पोलिसांचे लक्ष चुकवत तो रेल्वे स्थानकाबाहेर पडत होता. याच वेळी फलाट क्रमांक 7 आणि 8 वर असलेल्या काही आरपीएफ जवानांची त्याच्यावर नजर गेली. त्यांनी त्याला हटकून त्याच्या बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये दोन रिवॉल्व्हर आणि 22 जिवंत काडतुसे आढळून आली. त्यानुसार आरपीएफ जवानांनी त्याला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.  हेही वाचा

  दादरमध्ये सापडलं 9 कोटींचं कोकेन  डाऊनलोड करा Mumbai live APP  आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.