महिलेच्या वेशात चोऱ्या करणारा गजाआड !

मुंबई - महिलांचा वेश परिधान करून रेल्वेच्या महिला डब्यात चढून त्यांचे मोबाइल आणि पैसे लुटणाऱ्या एका चोराला अटक करण्यात रेल्वे पोलिसांना यश आलं आहे. या आरोपीचं नाव अविनाश सरेर असून तो ठाण्यातील राहणारा आहे.

अविनाश 28 नाव्हेंबरला सीएसटी स्थानकातून सुटणाऱ्या ठाणे ट्रेनमध्ये चढला आणि चाकूचा धाक दाखवून गाडीतील दोन महिलांचे मोबाइल घेऊन फरार झाला. त्यानंतर त्याच्या मागावर असलेल्या पोलिसांनी अटक करून त्याला दादर इथं आणलं. सध्या त्याला जेल कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Loading Comments