फेरीवाल्याला मारहाणप्रकरणी 'आरपीएफ’ अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल


फेरीवाल्याला मारहाणप्रकरणी 'आरपीएफ’ अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल
SHARES

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे फेरीवाल्याला अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी मंगळवारी सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्यात रेल्वे सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक जयपाल सिंह आणि हवालदार इम्रान काजी यांच्याविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.


काय आहे प्रकरण?

सीएसएमटी रेल्वे स्थानकाजवळ गेली १२-१५ वर्षे असफाक जमील खान हे शर्ट आणि टॉप विक्रीचा व्यवसाय करतात. ७ जून २०१७ ला दुपारी १ वाजेच्या सुमारास असफाक यांना आरपीएफचे जयपाल सिंह आणि इम्रान काजी यांनी आरपीएफ सीएसएमटी लोकल स्टेशनच्या कार्यालयात नेऊन बंदुकीच्या दस्त्याने मारहाण केली. तसंच जवळपास अडीच तास कार्यालयात बसवून ठेवलं. शिवाय ‘एके-४७’ दाखवत जीवे मारण्याची भीती दाखवली, अशी तक्रार असफाक यांनी २३ जानेवारी २०१८ ला सीएसएमटी रेल्वे पोलीस स्थानकात दाखल केली.


गावावरून आल्यानंतर तक्रार

घाबरल्यामुळे मारहाण झाल्यानंतर आपण गावी निघून गेलो होतो. पण, गावावरून आल्यावर तक्रार दाखल केली, असंही असफाक यांनी सांगितलं. त्यानंतर २ फेब्रुवारी २०१८ ला खान यांचा जबाब नोंदवण्यात आला. या प्रकरणात मंगळवारी पुन्हा जबाब नोंदवत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.


चौकशीचे आदेश

या प्रकरणी घटना घडल्यानंतर जुलै २०१७ मध्येच तात्काळ चौकशीचे आदेश देण्यात आले होते. पण, त्या व्यक्तीने तब्बल ६ महिन्यानंतर तक्रार दाखल केली आहे. त्या अधिकाऱ्यांना आम्ही निलंबित केलेलं नाही. शिवाय, आता त्यांच्याविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे, असं वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त सचिन भालोदे यांनी सांगितलं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा