प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे पोलिसांची भिकाऱ्यांवर कारवाई


प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे पोलिसांची भिकाऱ्यांवर कारवाई
SHARES

हार्बर मार्गावर सीएसटीहून पनवेलकडे निघालेल्या लोकलवर मस्जिद स्थानकाजवळ अज्ञात व्यक्तीने दगड मारल्याची घटना बुधवारी घडली होती. यात लोकलचे गार्ड फिरोत रफिक शेख (50) जखमी झाले होते. या घटनेनंतर पुन्हा एकदा रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वडाळा लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आय. बी. सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी वडाळा रेल्वे पोलीस ठाणे हद्दीतील 13 रेल्वे स्थानकांवर भिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.

या कारवाईत एकूण 15 (10 पुरूष, 5 महिला) भिकाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी करण्यात आली. या भिकाऱ्यांवर प्रतिबंधक कायदा कलम 560 अन्वये कारवाई करण्यात आली. या 15 जणांना कुर्ल्याच्या बेगर न्यायालयात हजर केले असता, 11 जणांना सोडून देण्यात आले. तर 4 जणांना चेंबूरच्या बेगर होम येथे ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा