'त्या' स्टंटबाज तरूणीवर गुन्हा दाखल

धावत्या लोकलमध्ये स्टंटबाजी केल्याच्या प्रकरणात पूजा भोसले या तरूणीला रेल्वे पोलिस केव्हाही ताब्यात घेऊ शकतात. या कायद्यानुसार रेल्वेतून प्रवास करताना फूटबोर्डवर उभं राहून स्टंटबाजी करणाऱ्यांवर अशा प्रकारची कारवाई केली जाते. त्यानुसार हा गुन्हा नोंदवण्यात आल्याचं रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

'त्या' स्टंटबाज तरूणीवर गुन्हा दाखल
SHARES

मध्य रेल्वे मार्गावर स्टंटबाजी करताना थोडक्यात बचावलेल्या पूजा भोसले या तरुणीवर अखेर रेल्वे पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. रेल्वे पोलिसांनी कलम १५६ अंतर्गत हा गुन्हा दाखल केला असून पोलिस तिला केव्हाही ताब्यात घेण्याची शक्यता आहे.


थोडक्यात बचावली

लोकल ट्रेनमध्ये स्टंटबाजी करताना थोडक्यात बचावलेल्या तरुणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एका प्रवाशाने प्रसंगावधान राखत तरुणीचे प्राण वाचवले अन्यथा ही तरुणी लोकलखाली आली असती.




विक्रोळी ते भांडुप स्थानकादरम्यान रेल्वेने प्रवास करताना पूजा भोसलेने दरवाजात उभं राहून स्टंट करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी हात सटकल्याने ती धावत्या लोकलमधून खाली पडणार, तोच मागे उभे असलेल्या प्रवाशांनी प्रसंगावधान दाखवत तिला पकडून वर खेचलं.


व्हिडिओ काढणाऱ्याला दम

पूजाची ही स्टंटबाजी मागे उभ्या असलेल्या एका प्रवाशाने त्याच्या मोबाइलमध्ये कैद केली. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यावेळी पूजाने आपल्या कृत्याबद्दल खंत किंवा पश्चात्ताप व्यक्त करण्याऐवजी मुजोरपणा दाखवत ज्याने व्हिडिओ काढणाऱ्याला सोडणार नसल्याची धमकी प्रसारमाध्यमांसमोर दिली. या घटनेची गंभीर दखल घेत रेल्वे पोलिसांनी पूजावर १५६ अंतर्गत गुन्हा नोंदवला.




या प्रकरणी पूजाला रेल्वे पोलिस केव्हाही ताब्यात घेऊ शकतात. या कायद्यानुसार रेल्वेतून प्रवास करताना फूटबोर्डवर उभं राहून स्टंटबाजी करणाऱ्यांवर अशा प्रकारची कारवाई केली जाते. त्यानुसार हा गुन्हा नोंदवण्यात आल्याचं रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.



हेही वाचा-

माझा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याला बघून घेईन, लोकलमध्ये स्टंट करणाऱ्या तरूणीचा दम

स्टंटबाजी बेतली जीवावर, तरूणी ट्रेनखाली येताना थोडक्यात बचावली



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा