स्टंटबाजी बेतली जीवावर, तरूणी ट्रेनखाली येताना थोडक्यात बचावली


स्टंटबाजी बेतली जीवावर, तरूणी ट्रेनखाली येताना थोडक्यात बचावली
SHARES

धावती लोकल पकडू नका किंवा तिच्यातून उतरू नका, दरवाजाजवळ उभे राहू नका, स्टंटबाजी करू नका, या आणि अशा अनेक उद्घोषणा रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सातत्याने करण्यात येत असतात. परंतु काही रेल्वे प्रवासी याकडे दुर्लक्ष करतात आणि आपला जीव धोक्यात घालतात. अशाच घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक तरूणी समोरून येणाऱ्या लोकल ट्रेनखाली जाताना थोडक्यात बचावल्याचं दिसत आहे.


काय आहे व्हिडिओत?

सोशल मीडियावर खासकरून व्हाॅट्सअॅपवर व्हायरल होत असलेल्या या क्लिपमध्ये एक तरूणी लोकलच्या फूटबोर्डवर (दरवाजा) उभी असलेली दिसत आहे. धावत्या ट्रेनमधून सातत्याने कपडे सावरताना आणि बाहेर डोकावताना ती दिसत आहे. त्यानंतर समोरून अचानक ट्रेन आल्यावर हात सुटून ही तरूणी ट्रेनमधून खाली घसरते. इतक्यात एक-दोन सहप्रवासी तिला पकडतात आणि पुन्हा वर खेचतात. थोडक्यात बचावलेली ही तरूणी घाबरलेलीही दिसते.


बघा, कशी घसरली तरूणी?घटना नेमकी कधीची?

हा व्हिडिओ व्हायरल होताच एकच खळबळ उडाली. सध्या रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (आरपीएफ) मोबाइलवरून हा व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहे. त्यावरूनच ही घटना नेमकी कुठे आणि कधी घडली हे कळू शकेल. तसंच ही तरूणी देखील कोण आहे हे लक्षात येऊ शकेल.हेही वाचा-

लोकलच्या महिला डब्यात अवतरला 'मोर'

वर्षभरात २२५ रेल्वे स्टंटबाजांवर कारवाईसंबंधित विषय