वर्षभरात २२५ रेल्वे स्टंटबाजांवर कारवाई

वाढती स्टंटबाजी रोखण्यासाठी रेल्वे सुरक्षा बला (आरपीएफ)ने कंबर कसली असून चालू वर्षात आतापर्यंत 'आरपीएफ'ने २२५ स्टंटबाजांवर कारवाई केली आहे.

वर्षभरात २२५ रेल्वे स्टंटबाजांवर कारवाई
SHARES

चालत्या लोकल ट्रेनमध्ये स्टंटबाजी करणं जीवघेणं ठरू शकतं, अशी रेल्वे प्रशासनाने वारंवार सूचना करूनही 'या' स्टंटबाजांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे. ही वाढती स्टंटबाजी रोखण्यासाठी रेल्वे सुरक्षा बला (आरपीएफ)ने कंबर कसली असून चालू वर्षात आतापर्यंत 'आरपीएफ'ने २२५ स्टंटबाजांवर कारवाई केली आहे.


जीवावर उदार

उपनगरीय लोकल ट्रेनच्या दरवाजाला लटकून इतर प्रवाशांना चढू-उतरू न देणे, मोबाइल हिसकावणे तसंच महिला प्रवाशांची छेड काढण्याचे प्रकार सातत्याने सुरूच असतात. त्यातच काही स्टंटबाज जीवावर उदार होत इतर प्रवाशांच्या जीवालाही धोका निर्माण होईल, अशी स्टंटबाजी करतात. या प्रवाशांना रोखण्यासाठी 'आरपीएफ'ने कडक कारवाईचं धोरण स्वीकारलं आहे. त्यानुसार २०१७ मध्ये अशा ७६१ स्टंटबाजांवर आरपीएफने कारवाई केली होती.



पालकांकडून बाँड

या स्टंटबाजीत मोठ्या प्रमाणात अल्पवयीन मुलं आढळून आल्याने 'ज्युएनाइल अॅक्ट'नुसार त्यांवर कारवाई करणं आरपीएफला कठीण जाऊ लागलं. त्यामुळे स्टंटबाजी करणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या पालकांना बोलावून त्यांच्याकडून ''संबंधित मुलगा पुन्हा अशी हरकत करणार नाही,'' असा बाँड लिहून घेण्यास आरपीएफने सुरूवात केली. आरपीएफने केलेल्या कारवाईत गोवंडी आणि मानखुर्दमधील तरुणांचं प्रमाण लक्षणीय आहे.



कारवाईत येणाऱ्या अडचणी

स्टंटबाजी रोखण्यासाठी यापूर्वी आरपीएफने प्रत्येक स्थानकावर ४ पोलिस तैनात केले होते. स्टंटबाज दिसल्यास त्यांचे फोटो काढून हे जवान ज्या दिशेने गाडी जात आहे, त्यापुढील स्थानकावर तैनात जवानांना पाठवाचे आणि स्टंटबाजांना ताब्यात घेऊन कारवाई करायचे. परंतु या कारवाई दरम्यान स्टंटबाज घाबरून पळू लागल्यास आणि दुर्दैवाने त्याला अपघात झाल्यास त्यासाठी जवानांना दोषी मानलं जायचं. त्यामुळे हळूहळू ही मोहीम थंडावत गेली.

त्यामुळे आरपीएफने कारवाई करण्यासोबतच स्थानिक पोलिसांच्या सोबतीने शाळा, काॅलेज, बस स्थानक परिसरात जनजागृतीचंही काम करण्यासही सुरूवात केली आहे.



हेही वाचा-

कौटुंबिक वादाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न, लोकांनी वाचवलं

घाटकोपरमध्ये मोबाइलचाेराचा तरूणावर चाकूहल्ला



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा