SHARE

घरातील भांडणाला कंटाळून एका 54 वर्षाच्या व्यक्तीने कुर्ला रेल्वे स्टेशवरील रुळावर झोपून आत्महत्येचा प्रयत्न केला. दरम्यान स्टेशनवरील काही प्रवाशांनी धावत जाऊन त्या व्यक्तीला रुळावरून बाजूला करत त्याचे प्राण वाचवले. हा संपूर्ण प्रकार कुर्ला स्थानाकावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.


प्रवाशांनी वाचवलं

स्टेशनवरील प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवासी स्टेशनवर ट्रेनची वाट पाहात होते. त्याचवेळी एक व्यक्ती अचानक रेल्वे रुळावर आला आणि झोपला. हे पाहून काही प्रवासी आरडाओरड करू लागले. त्याचवेळी काही प्रवाशांनी सतर्कता दाखवत रेल्वे रुळावर झोपलेल्या प्रवाशाकडे गेले आणि त्याला बाजूला केले. या सर्व प्रकरानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी त्या व्यक्तीकडे आत्महत्येचं कारण विचारलं असता कौटुंबिक वादातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचं त्या व्यक्तीने सांगितलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या