लोकलमध्ये पुन्हा स्टंटबाजी, व्हिडिओ व्हायरल


लोकलमध्ये पुन्हा स्टंटबाजी, व्हिडिओ व्हायरल
SHARES

धावत्या लोकलमध्ये दरवाजावर लटकणे, गाडीने वेग घेतला तरी दोन्ही पाय प्लॅटफॉर्मवर घासत नेणे, धावत्या लोकलच्या बाजूने जाणाऱ्या पुलाच्या कठड्यावर पाय घासत नेणे, लोकल सुरू असताना लोकलमध्ये चढणे टवाळखोरांची ही स्टंचबाजी हार्बर मार्गावर पुन्हा जोरात सुरू झाली आहे. नुकताच याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.



काय आहे व्हिडिओत?

या व्हिडिओत दिसत असलेल्या चार तरुणांनी हार्बर मार्गावरील चुन्नाभटी स्टेशनवर सीएसटीच्या दिशेने जाणारी लोकल पकडली. हार्बर मार्गावर धावणाऱ्या गाड्यांचा वेग रे रोड, डॉकयार्ड रोड, सँडहर्स्ट रोड आदी स्थानकांदरम्यान बऱ्यापैकी कमी असतो. याचा फायदा घेत या चौघांनी चुन्नाभटी ते जीटीबीनगर स्टेशनदरम्यान धावत्या लोकलमध्ये वेगवेगळे स्टंट करू लागले.


व्हिडिओ व्हायरल

धावत्या लोकलमध्ये दरवाजावर लोंबकळणे, खिडक्यांवर चढून पुढच्या दरवाजाकडे जाणे, बाहेरील पोलला हात लावणे हे सर्व प्रकार करत होते. कहर म्हणजे स्थानकावर थांबलेल्या एका प्रवाशाचाही या तरुणांनी मोबाइल हिसकावला. यांच्यातील एका तरुणाने सेल्फी घेत हा व्हिडिओ शूट केला. हा व्हिडिओ काही तासातच इतका वायरल झाला की, त्याची चर्चा रेल्वे पोलिस दलात सुरू झाली. सध्या या चौघांची ओळख पटवण्याचा पोलिस प्रयत्न करत आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा