घाटकोपरमध्ये मोबाइलचाेराचा तरूणावर चाकूहल्ला


घाटकोपरमध्ये मोबाइलचाेराचा तरूणावर चाकूहल्ला
SHARES

घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरात एका मोबाइल चोराने तरुणावर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे. शनिवारी सकाळी पहाटे ही घटना घडली असून या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.


नेमकं काय झालं?

शनिवारी २८ जुलै रोजी सागर सुरेश हिवरकर हा तरुण आपल्या कामाला जाण्यासाठी निघाला होता. घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळील खोत लेनमधून जात असताना पहाटे ५ वाजता अंधाराचा फायदा घेत २ चोरांनी सागर जवळील मोबाइल, त्याची बॅग आणि पैशांचं पाकीट हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. सागरने त्यांना विरोध केला असता चोरांनी सागरच्या पोटावर चाकूने वार केला. या हल्ल्यात सागर गंभीर जखमी झाला. सागरवर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


फेरीवालेच लुटारू

या संदर्भात घाटकोपर पोलिसांनी २ आरोपींना जेरबंद केले असून ते दोघेही घाटकोपरमधील खोत लेन परिसरातील फेरीवाले आहे. ते याच परिसरात टोमॅटो विक्री करतात. या दोघांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती घाटकोपर पोलिसांनी दिली.



हेही वाचा-

शत्रुघ्न सिन्हा यांच्या घराबाहेर गोळीबार

कार, दुकानं फोडणारी टोळी जेरबंद



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा